शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोत कोरडे; 17 टँकर, 48 विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

गतवर्षी नोव्हेंबरपर्यंत पावसाची रिपरीप सुरू होती. बारा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे जमिनीत पूनर्भरण झाले व भूजलस्तर वाढला. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाई  उद्भवली नाही; मात्र मार्चअखेरपासून तापमान ४० अंशावर गेल्यानंतर मात्र मेळघाटातील उंचावरील गावे तहानली. या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाई आराखड्यानुसार २९१ उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मे महिन्यातील रखरखत्या उन्हामुळे गावांगावातील जलस्रोत कोरडेठाक पडले आहे, त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे १७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय टंचाईग्रस्त गावांमध्ये २९१ उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तात्पुरती उपाययोजना म्हणून ७१ गावांमध्ये ३२ विंधन विहिरी व ४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.गतवर्षी नोव्हेंबरपर्यंत पावसाची रिपरीप सुरू होती. बारा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे जमिनीत पूनर्भरण झाले व भूजलस्तर वाढला. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाई  उद्भवली नाही; मात्र मार्चअखेरपासून तापमान ४० अंशावर गेल्यानंतर मात्र मेळघाटातील उंचावरील गावे तहानली. या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाई आराखड्यानुसार २९१ उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. एप्रिलपश्चात ग्रामीणमधील ७५ गावांमध्ये पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. यासाठी बोअरवेल, विंधनविहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये तिवसा तालुक्यात १, मोर्शी ६, वरुड १,  अचलपूर ७, चिखलदरा १६ व धारणी तालुक्यात १ विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. याशिवाय ४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ४, नांदगाव खंडेश्वर १४, भातकुली १, तिवसा २, मोर्शी ५, वरुड २, चांदूर रेल्वे ११, अचलपूर १, चिखलदरा ५, धारणी २ व धामणगाव तालुक्यात १ विहिरीचा समावेश आहे.

चिखलदरा तालुक्यात १६ टँकरजिल्ह्यात सद्यस्थितीत १७ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. यामध्ये सर्वाधिक १६ टँकर चिखलदरा तालुक्यात आहेत. यात एकझिरा, मोथा, आकी, बगदरी, तारुबांदा, बहादरपूर, धरमडोह, लवादा, आलाडोह, रायपूर, गौलखेडा, सोमवारखेडा, नागापूर, कंडूखेडा, आवागड व खोंगडा तसेच चांदूर रेल्वे तालुक्यात सावंग्री मग्रापूर या गावात टँकरने पाणी पुरवठा होत आहे.

६३० पैकी २९१ उपाययोजना सुरूकृती आराखड्यात तहानलेल्या ६३० गावांसाठी २९१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी २९१ उपाययोजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. वहीकामे प्रगतीत आहेत. यामध्ये ८४ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, ६ तात्पुरत्या पुरक नळ योजना, १७ टँकर, ८० विहिरींचे अधिग्रहण, १०४ नवीन विंधन विहिरी, कूपनलिका या कामांचा समावेश आहे.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई