अमरावती : विविध योजना व शिर्षकातंर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारा शहरात १४ सिमेंट रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र, यामध्ये पाण्यासंदर्भातील नियोजन नसल्यामुळे अनेक भागात पाणी तुंबल्याने पोलखोल झालेली आहे. अनेक रहिवाशी भागात व व्यापारी संकुलात पाणी साचल्याचे खापर मात्र महापालिकेवर फोडण्यात आले आहे.
शहरातील मुख्य व महत्वाच्या जयस्तंभ चौक, राजकमल चौक, जवाहर गेट, श्याम चौक, सबनीस प्लॉट, मध्यवर्ती बसस्थानक, कल्याणनगर आदी भागात बांधकाम विभागाद्वारे या तीन वर्षात सिमेंट कॉक्रिटचे रस्ते बांधण्यात आलेले आहे. महापालिकेजवळ सक्षम यंत्रणा असताना या कामांची यंत्रणा बांधकाम विभाग होता. या कामांमध्ये बांधकाम विभागाचे पुरेसे नियोजन नसल्यामुळे आता दमदार पाऊस झाल्यास लगतच्या घरामंध्ये व व्यापारी संकुलात पाणी शिरले होते. या आठवड्यात झालेल्या संततधार पावसाने नियोजनाच्या अभावाचे पितळ उघडे पडले व नागरिकांनी महापालिकेच्या नावाने शिमगा केला आहे.
कोट
बांधकाम विभागाने केलेल्या रस्ते कामांमुळे काही भागात पाणी साचल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात या विभागाला अनेक पत्र दिली आहेत.
- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका