शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गाजली पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:04 IST

जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाईच्या समस्येवर कोणते नियोजन व उपाययोजना केल्या आहेत, या मुद्द्यावर जिल्हा परिषदेतील विरोधी व सत्ताधारी सदस्यांनी शुक्रवारी आमसभेत प्रशासनाला धारेवर धरले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद आमसभा : विरोधकांसह सत्ताधारीही आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाईच्या समस्येवर कोणते नियोजन व उपाययोजना केल्या आहेत, या मुद्द्यावर जिल्हा परिषदेतील विरोधी व सत्ताधारी सदस्यांनी शुक्रवारी आमसभेत प्रशासनाला धारेवर धरले.मोर्शी तालुक्यातील ७० गाव पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत निधी मंजूर झाला आहे. मग योजना का सुरू केली नाही, असा सवाल सदस्यांनी करीत मजीप्रा व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सध्या दुष्काळग्रस्त वरूड, मोर्शी तालुक्यांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीपुरवठा विभागाची कार्यवाही शून्य आहे. पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडविण्यात यावी. सोबतच वरील दोन्ही तालुक्यांना हातपंप दुरुस्तीसाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करू न देण्याची मागणी सभागृहात सदस्यांनी केली.अचलपूर, चांदूर बाजार या तालुक्यांतही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही भागांमध्ये निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा विभागाने काही वर्षांपूर्वी बळेगाव येथे पाण्याची टाकी बांधली आहे. मात्र, या टाकीचे काम निकृ ष्ट दर्जाचे झाल्याचा मुद्दा प्रवीण तायडे यांनी उपस्थित केला. बबलू देशमुख यांनी समर्थन करीत संपूर्ण जिल्ह्यात पाण्याच्या टाकीचे काम असमाधानकारक असून, सखोल चौकशीची मागणी सभागृहात केली.धोतरखेड पाणीपुरवठा योजनेसंदर्भात प्रताप अभ्यंकर यांनी मुद्दा मांडला. यावेळी शिक्षण, बांधकाम, सिंचन, महिला व बाल कल्याण, कृषी, पंचायत याही विभागांचे मुद्दे सदस्य पूजा हाडोळे, प्रियंका दगडकर, विक्रम ठाकरे, प्रकाश साबळे, महेंद्रसिंह गैलवार, वासंती मंगरोळे, दिनेश टेकाम आदींनी मांडले. पीठासीन सभापती नितीन गोंडाणे यांनी या सूचना मान्य केल्या. सभेला सर्व पदाधिकारी, सदस्य व खातेप्रमुख उपस्थित होते.मोर्शी, वरूड तालुक्यांतील पाणीटंचाईचा मुद्दा रेटण्यात उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सारंग खोडस्कर, शरद मोहोड, संजय घुलक्षे, प्रताप अभ्यंकर, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे , सुहासिनी ढेपे, गौरी देशमुख यांचा सहभाग होता.बबलू देशमुख यांनी अध्यक्षांना वाहन खरेदीबाबत प्रस्ताव तयार करावा व शासनाकडे पाठवून व्यवस्था करावी, अशी सूचना केली. ही मागणी पीठासीन सभापतींनी मंजूर केली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे हे होते. प्रशासकीय धुरा प्रभारी सीईओ विनय ठमके यांनी सांभाळली.शिंदी येथील बोअरवेल पळविलीअचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे १६ लाख रुपयातून बोअरवेल मंजूर करण्यात आली होती. ती काकडा गावात करण्यात आल्याने शिंदी येथे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिंदी सर्कलच्या सदस्य शिल्पा भलावी यांनी केल्यावरही प्रशासनाने दखल घेतली नाही. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बबलू देशमुख यांनी केली. त्यानुसार चौकशी करून भलावी यांच्या मागणीनुसार टंचाई आराखड्यातून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता सावळकर यांनी दिले.तोडगा काढणार, कृषी अधिकाऱ्याचे आश्वासनजिल्हा परिषदेच्या ३० नोव्हेंबरच्या सभेत पटलावरील बरेच मुद्दे सहमतीने मंज़ूर करण्यात आले. जिल्हा परिषद सेस फंड (जिल्हा निधी) मधून लोकपयोगी कामांचे सुमारे सात कोटीचे नियोजन मंजूर करताना प्रत्येक सदस्याच्या सर्कलमध्ये काम मिळावे. बांधकाम विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणाच्या १ कोटी ५४ लाखांच्या नियोजनातही समसमान न्याय द्यावा, अशी मागणी रवींद्र मुंदे यांनी केली. यावर बबलू देशमुख यांनी तसा ठराव तरतुदीनुसार मंजूर करण्यास ठेवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेंतर्गत विहीर मंजूर करताना अंतराचे संमतिपत्र जोडले असताना प्रस्ताव मंजूर होत नसल्याने सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावर कृषी अधिकारी तडवी यांनी सीईओंच्या मार्गदर्शनात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.