शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात तीन हजार गावांत पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 15:35 IST

४३३५ उपाययोजना प्रस्तावित : आराखडा तयार, ९५.२० कोटींचा खर्च 

अमरावती : सरासरीच्या २५ टक्के कमी पावसामुळे पश्चिम विदर्भात भूगर्भाचे पुनर्भरण झालेले नसल्याने भूजलात १२ फुटांपर्यंत कमी आलेली आहे. परिणामी जानेवारी ते जून या कालावधीत तीन हजार दोन गावांना पाणीटंचाई झळ पोहोचणार आहे. यासाठी ४३५१ उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. यावर ६०.२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा कृती आराखडा विभागीय आयुक्तांनी शासनाला सादर केला.

अत्यल्य पावसामुळे यंदा गावागावांतील जलस्त्रोत आटायला सुरुवात झाली आहे. भूजल पातळीदेखील मोठ्या प्रमाणावर घटली आहे. लहान-मोठ्या ५०२ प्रकल्पांच्या साठ्यात घट झाल्याने आगामी काळात पाण्याचे दुर्भिक्ष राहणार असल्याचे वास्तव आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, विभागात पाणीटंचार्ईच्या पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत  १,८५२ गावांमध्ये पाणीटंचाईची धग जाणवणार आहे. यासाठी २९२८ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ५१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.

 एप्रिल ते जून या कालावधीतील दुसऱ्या टप्प्यात ११५० गावांत पाणी टंचाई राहणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेद्वारा १३७३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ९.१२ कोटींचा निधी खर्च होणार आहे. कृती आराखड्यानुसार १५२ गावांध्ये ४४१ विहिरी खोल करण्यात येणार आहे. यावर १.९० कोटींचा खर्च होईल, २६५२ गावांत २८९७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. यावर २१.१२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ५२२ गावांतील ४८१ नळ योजनांची विशेष दुरूस्तीवर १५.९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ११०८ गावांमध्ये १३०८ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येईल. यावर १२.१८ कोटी व २३४ गावांमध्ये २०२ तात्पुरत्या पूरक नळ योजनांच्या दुरूस्तीसाठी ९.३५ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

 ५०२ प्रकल्पांत ३८ टक्केच जलसाठा

  • विभागात नऊ मुख्य प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ३५ टक्के जलसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत ५१ टक्के जलसाठा आहेत, तर ४६९ लघु प्रकल्पांत ३५ टक्के जलसाठा आहे. एकूण ५०२ प्रकल्पांत ३६ टक्के जलसाठा आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा गृहित धरता मार्चअखेर प्रकल्प कोरडे पडण्याची शक्यता आहे. विभागात बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्प आताच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. 
  • विभागात सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात ५१, अकोला चार व बुलडाणा जिल्ह्यात १२१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात १ व बुलडाणा २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
टॅग्स :water shortageपाणीटंचाईVidarbhaविदर्भ