शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईची धग वाढली, १४३ विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:09 IST

उन्हाच्या तीव्रतेसह पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १११ गावांतील १४३ विहिरी अधिग्रहित केल्या असून, या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले असून, टँकरचीही मागणी वाढत आहे.

ठळक मुद्देपाणीस्त्रोत आटले : १२ गावांना टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाच्या तीव्रतेसह पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १११ गावांतील १४३ विहिरी अधिग्रहित केल्या असून, या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले असून, टँकरचीही मागणी वाढत आहे.गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा फटका नागरिकांना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया योजनांचे जलस्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागत आहे. पाणी टंचाईची समस्या चिखलदरा तालुक्यात टंचाईग्रस्त गावाची संख्या बरीच आहे. त्यानंतर इतर तालुक्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा पर्यायी स्त्रोत उपलब्ध असल्याने टंचाईची दाहकता कमी करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून, त्यानुसार उपायोजना सुरू केल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव परिसरातील पाणी असलेल्या विहिरी अधिग्रहित करून ते ग्रामस्थांना पुरविले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १११ गावांतील १४३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. १२ गावांना ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे जि.प. पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी 'लोकमत'ला सांगितले. मेळघाटसोबतच आता सपाटीवरील गावातून विहीर अधिग्रहण, नळदूरूस्ती योजना, कूपनलिका आदींसाठी प्रस्ताव येत आहेत. एकंदर जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली असून, विहीर अधिग्रहणासोबत टँकरने पाणीपुरवठा करून प्रशासन गावकºयांना पाणी उपलब्ध करून दिल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.१२ गावांना टँकरने पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.गत आठ दिवसांत टँकरची संख्याही वाढली असून सध्या १२ गावांना ९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात चिखलदरा तालुक्यातील पस्तलाई, भांद्री, सोनापूर, तारूबांदा, पाचडोंगरी, कोयलारी, मनभंग, सोमवारखेडा, गौलखेडा, नागापूर व मोर्शी तालुक्यातील सावरखेडा गावांचा समावेश आहे.१७० गावांत कूपनलिकापाणीस्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील १७० गावांमध्ये १८१ कूपनलिकांपैकी ४९ गावांत सध्या कामे सुरू आहे. याशिवाय १८२ गावांमध्ये नळयोजना, दुृरूस्तीची कामे सुरू आहेत. मात्र विहीर खोलीकरण, गाळ काढणे असे एकही काम सध्या तरी सुरू नसल्याचे या अहवालातील माहितीनुसार दिसून येत आहे.अप्परवर्धा प्रक ल्पात ३६.७१ टक्के जलसाठाअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्परवर्धा प्रकल्पामध्ये रविवारअखेर ३२१ दलघमी जलसाठा असून, त्यातील २०७ दलघमी जलसाठा उपयुक्त आहे. उपयुक्त जलसाठ्याची ही टक्केवारी ३६.७१ टक्के असून, गतवर्षी याचवेळी या प्रक ल्पात ३७.५८ टक्के जलसाठा होता.