शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

२५ ठिकाणचे पाणीनमुने दूषित; आरोग्य विभागाने बजाविली नोटीस

By जितेंद्र दखने | Updated: May 9, 2024 21:49 IST

खबरदारीसाठी उपाययोजना करण्याचे ग्रामपंचायतींना निर्देश

अमरावती : वाढत्या तापमानासोबतच ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यातल्या त्यात दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबंधित गटविकास अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

ग्रामीण सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असतांना काही ठिकाणी जलस्त्रोताचे पाणी नमूने दूषित आले आहेत. असे असले तरी अद्याप जिल्ह्यात कुठेही साथरोगाचा प्रादुर्भाव नसल्याचा माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागात अतिसार, टायफाइडचे रुग्ण आढळून येत असतात, खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य विभागांतर्गत साथरोग विभागाकडून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचे पाणी नमुने तपासले जातात.

त्यानुसार मार्चमध्ये १४ तालुक्यांतील १ हजार ४९१ पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यापैकी २५ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य आढळून आले आहे. दूषित जलस्रोतांमध्ये अतिरिक्त ब्लिचिंग पावडरच्या माध्यमातून ते पाणी पिण्यास योग्य केले जाते. गावाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांमध्ये नियमानुसार ब्लिचिंग पावडरचे प्रमाण असणे गरजेचे आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याने काही ठकाणी पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत.११ टॅकरव्दारे पाणी पुरवठासद्यःस्थितीत जिल्ह्यात ११ टँकर सुरू असून त्या माध्यमातून नागरिकांची तहान भागविण्यात घेत आहे. खांदूरेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यात बेला, मोथा, धामकडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार येथे प्रत्येकी एक तर खडीमल येथे चार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्यापही झाली नसल्याने या गावांना टँकराद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी टँकरच्या दुषित पाण्यामुळेच चिखलदरा तालुक्यातील पाचङोंगरी,कोयलारी या गावांमध्ये साथजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सद्यःस्थितीत ११ टँकरच्या माध्यमातून गावांची तहान भागविली जात आहे.

तालुकानिहाय दूषित नमुन्यांची संख्याअमरावती ६,अचलपूर ३, चांदूर रेल्वे ३, धामणगाव ३ ,तिवसा १ ,दर्यापूर१,वरूड ४, भातकुली ४

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणAmravatiअमरावती