उद्दिष्टांचे तीनतेरा : कोल्हापुरी बंधाऱ्याची दारे गायबबेनोडा (शहीद) : येथील शहीद स्मृति विद्यालयाजवळ असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दारे अनेक दिवसांपासून गायब आहेत त्यामुळे जलसंधारणाच्या उद्दिष्टाचे तीनतेरा वाजले आहे.महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाकडून या परिसरातील भूजल पातळी वाढावी या उद्दिष्टाने या कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, बांधकाम तयार असूनसुद्धा केवळ पाणी अडविण्याकरिता लागणारी लोखंडी दारेच नसल्यामुळे पाणी अडविणे जावू शकत नाही. त्यामुळे शासनाने या बंधाऱ्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ गेलेला आहे.एकीकडे कोल्हापुरी बंधाऱ्याची दारे नसल्यामुळे पाणी वाहत जात आहे तर दुसरीकडे याच नदीच्या खोलीकरणावर लाखोंचा खर्च करण्यात आलेला आहे. हा कोल्हापुरी बंधारा गावाला लागूनच असल्यामुळे जर येथे पाणी साचले तर गावातील भूजल पातळी वाढण्यास निश्चितच मदत होईल. परंतु सदर अधिकारी अनेक दिवसांपासून कुंभकर्णी निद्रेत आहेत. तेव्हा या बंधाऱ्याची दारे लावून भूजल पातळी वाढविण्यास मदत करावी, अशी मागणी बेनोडा शहीद येथील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
जलपुनर्भरणाचा बट्ट्याबोळ
By admin | Updated: October 25, 2016 00:14 IST