वरूड : ऊन्हाळयात पक्ष्यांना पाण्यासाठी भटकावे लागते. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी अन्न नसते. म्हणून द ग्रेट मराठा फाऊंडेशनच्यावतीने पक्ष्यांकरिता पिंप लावून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्ष्यांची पाणपोई हा उपक्रम द ग्रेट मराठा फाऊंडेशन वरूड, बेलोना आणि मोर्शीच्यावतीने राबविण्यात येत आहे.
पक्ष्यांसाठी विविध ठिकाणी १५० पिंप लावण्यात आले आहेत. त्यासाठी तेलाचे रिकामे पिंप विशिष्ट आकार देऊन त्यात पाणी, धान्य ठेवता येईल असे बनविण्यात आले आहेत. द ग्रेट मराठा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन गुर्जर, यशपाल राऊत, दीपक कोचर, विशाल आजनकर, नितीन देवघरे, बबलू भोरवंशी, रोशन धांडे, उमेश नागले, कृष्णा बेलसरे, बंटी धरमठोक, कपिल कोचर, करण उईके, अरुण सोनारे, सोनु दुर्गे हे तरुण पशूपक्षी संवर्धनाकरिता झटत आहेत.
---------