लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळून आठ गावांना नऊ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाचपेक्षा अधिक गावांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठविले जाणार आहेत. एका मेसेजवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पावले टाकली आहेत.उन्हाचे चटके जसे जाणवू लागतात, तशी मेळघाटात पाणीटंचाई उग्र रूप धारण करते. आजही चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यानुसार आकी, बगदरी, सोनापूर, सोमवारखेडा, एकझिरा, खंडुखेडा, तारुबांदा, मलकापूर या आठ गावांमध्ये नऊ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सोनापूर येथे दोन, तर उर्वरित ठिकाणी प्रत्येकी एक टँकर लावण्यात आला आहे. हतरू येथील दोन व कोरडा येथील एक विहीर अधिग्रहीत करण्यात आली. धरमडोह, बहाद्दरपूर, कोयलारी, मनभंग या गावांसाठी टँकर लावण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जाणार असल्याची माहिती गटाविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली.एका मेसेजवर माहिती अन् निराकरणतालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पाहता, चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मोबाइलवर पाणीटंचाईसंदर्भात व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. त्यामध्ये सरपंच, ग्रामसचिव, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य आदी महत्त्वपूर्ण अधिकारी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याद्वारे माहिती मिळाल्यानंतर गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालविला.दुर्गम, अतिदुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये पाणीटंचाईची तात्काळ माहिती व्हावी, यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. तात्काळ माहिती घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. आठ गावांमध्ये नऊ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विहिरी अधिग्रहित करून प्रस्तावित गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.- प्रकाश पोळगटविकास अधिकारीपंचायत समितीचिखलदरा
चिखलदऱ्यात आठ गावांत नऊ टँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST
उन्हाचे चटके जसे जाणवू लागतात, तशी मेळघाटात पाणीटंचाई उग्र रूप धारण करते. आजही चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यानुसार आकी, बगदरी, सोनापूर, सोमवारखेडा, एकझिरा, खंडुखेडा, तारुबांदा, मलकापूर या आठ गावांमध्ये नऊ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
चिखलदऱ्यात आठ गावांत नऊ टँकरने पाणी
ठळक मुद्देएका मेसेजवर तक्रारीचे निराकरण : पाणीटंचाई झाली उग्र, पाच गावे प्रस्तावित