शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावातून आधी पाणीचोरी, नंतर परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:49 IST

मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी पाझर तलावातून आधी पाण्याची चोरी नंतर रीतसर परवानगी, असा अफलातून कारभार वनविभागाने चालविल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देवनविभागाचा अफलातून कारभार : जिल्हा परिषदेकडे रोहयो वनक्षेत्राधिकाऱ्यांचे पत्र

आॅनलाईन लोकमतअमरावती : मोर्शी रोहयो परिक्षेत्रांतर्गत दिवाणखेड येथील रोपवाटिकेतील रोपांना जिवंत ठेवण्यासाठी पाझर तलावातून आधी पाण्याची चोरी नंतर रीतसर परवानगी, असा अफलातून कारभार वनविभागाने चालविल्याचे दिसून येते. नर्सरीत पाणी वापराबाबत रोहयो वनक्षेत्राधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेकडे अधिकृत परवानगी मागण्याबाबतचे आदेश उपवनसंरक्षकांनी दिले आहे.‘लोकमत’ने २२ फेब्रुवारी रोजी ‘रोपवाटिकेत पाणी चोरी’ या आशयाखाली सचित्र वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग खळवळून जागे झाला. दरम्यान प्रभारी सीईओ के.एम.अहमद यांनी रोपवाटिकेत पाणी चोरीप्रकरणी जलसंधारण अधिकाºयांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषदेच्या मालकी हक्काचे असलेल्या दिवाणखेड येथील पाझर तलावातून विनापरवानगीने पाणी उपसा होत असल्याबाबत कनिष्ठ अभियंत्याकडे वनविभागाला नोटीस देणे, विनापरवानगीने पाणी उपसा केल्याप्रकरणी कार्यवाही करणे आदी कर्तव्य बजावण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेने पाणी चोरीबाबत जाब विचारताच वनविभागाची भंबेरी उडाली. अखेर उपवनसंरक्षक हेमंत मीना यांनी याप्रकरणी अधिक वाद न वाढविता नर्सरीतील रोपांचे संगोपन, संवर्धनासाठी जिल्हा परिषदेतून पाणी वापराबाबतची अधिकृत परवानगी मागण्याबाबतचे निर्देश रोहयो वनक्षेत्राधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार पाणी वापराबाबत परवानगी मिळण्यासाठी रोहयो वनक्षेत्राधिकाºयांनी पत्रव्यवहार चालविल्याची माहिती आहे. वनविभाग देखील चोरी करू शकतो, हे पाझर तलावातून पाणी उपसा प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.पाणी चोरीप्रकरणी वनविभाग बॅकफूटवरदिवाणखेड येथील पाझर तलाव जि.प.च्या अखत्यारित येते. या तलावातून पाण्याची चोरी करू न रोपे जगविण्याची शक्कल रोहयो वनक्षेत्राधिकाऱ्यांनी लढविली. त्यामुळे हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या सभागृहात गाजणार ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. तत्पूर्वी पाझर तलावातून पाणी वापराची परवानगी मिळविण्यासाठी वनविभागाने आता शर्थीचे प्रयत्न चालविले आहे. एकूणच याप्रकरणी वनविभाग बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे.दिवाणखेड येथील पाझर तलावातून पाणी वापराबाबत जिल्हा परिषदेकडून अधिकृत परवानगी मिळविण्यासाठी आरएफओंना आदेश दिले आहेत. त्यानुसार रोहयो वनक्षेत्राधिकाºयांनी पत्रव्यवहार चालविला असून, लवकरच नर्सरीत पाणी वापराची परवानगी मिळेल.- हेमंत मीना,उपवनसंरक्षक, अमरावती