शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

विदर्भावर जलसंकट, साठा २५ टक्क्यांवर, ७० गावांत टँकरवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:04 IST

फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यात विदर्भातील जलसाठा सरासरी २५ टक्क्यांवर स्थिरावल्याने जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

अमरावती : फेब्रुवारीच्या तिस-या आठवड्यात विदर्भातील जलसाठा सरासरी २५ टक्क्यांवर स्थिरावल्याने जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. नागपूर व अमरावती वगळता राज्यातील अन्य चार प्रदेशांतील जलप्रकल्पांची पातळी समाधानकारक आहे. दरम्यान, अमरावती विभागातील ७० गावांमध्ये ५६ टँकर्स ग्रामस्थांची तहान भागवित आहेत.          अमरावती प्रदेशातील ४४३ जलप्रकल्पांमध्ये १७ फेब्रुवारीअखेर केवळ  २७.८७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर नागपूर प्रदेशातील ३८५ प्रकल्पांमध्ये २३.९३ टक्के अर्थात ११२५ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. कोकण प्रदेशातील १७५ प्रकल्पांमध्ये ६५.५५ टक्के, नाशिक प्रदेशातील ५६१ प्रकल्पांमध्ये ५७.४८ टक्के, पुणे प्रदेशातील ७२५ प्रकल्पांमध्ये ६६.५२, तर मराठवाडा प्रदेशातील ९५७ प्रकल्पांमध्ये ४७.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अन्य चारही विभागामध्ये सरासरी ६० ते ६२ टक्के जलसाठ्याच्या तुलनेत अमरावतीत २७.८७, तर नागपूरमधील २३.९३ टक्के जलसाठा वैदर्भीयांच्या चिंतेत भर पाडणारा आहे. राज्यातील ३२४६ प्रकल्पांमध्ये ५२.८३ टक्के जलसाठा शिल्लक आहे.अमरावती प्रदेशातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये २६.२८  टक्के, २४  मध्यम प्रकल्पांमध्ये ३७.५५ टक्के, ४०९ लघू प्रकल्पांमध्ये २५.३९ टक्के जलसाठा आहे, तर नागपूर प्रदेशातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२.११, ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये ३०.३४ व ३२६ लघू प्रकल्पांमध्ये २८.६३ टक्के जलसाठा असल्याने यावर्षी विदर्भाला भीषण पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावतीच्या तुलनेत नागपूर प्रदेशातील जलपातळी अधिक घसरली असताना, तेथे टँकरवारी सुरू झालेली नाही.राज्यात २४९ गाव-वाड्या तहानल्या

राज्यातील २४५ गावे व चार वाड्यांमध्ये ५४ शासकीय व १६८ खासगी अशा एकूण २२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात नाशिक विभागातील ६९ गावांमध्ये ३८ टँकर, पुणे विभागातील एका गावात एक टँकर, औरंगाबाद विभागातील १०८ गाववाड्यांत १२७, तर अमरावती विभागातील ७० गावांमध्ये ५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केली जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालय व पाणीपुरवठा कार्यालयाने दिली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ९० गाव-वाड्यांमध्ये एकूण ६८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

टॅग्स :Waterपाणी