शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाणीचोरांच्या मुसक्या आवळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:23 IST

सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह १५ महसूल मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला. किंबहुना जिल्ह्यातच दुष्काळस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जलाशये, प्रकल्पांमधून अनिर्बंंध पाणी उपसा करणाऱ्यांच्या मुसक्या आता आवळल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासननिर्देश : अनिर्बंध पाणी उपशावर दंडात्मक अन् फौजदारी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह १५ महसूल मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला. किंबहुना जिल्ह्यातच दुष्काळस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जलाशये, प्रकल्पांमधून अनिर्बंंध पाणी उपसा करणाऱ्यांच्या मुसक्या आता आवळल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण नोव्हेंबरमध्येच जाहीर केले. यानंतर जलसंपदा विभागाद्वारे भरारी पथकांच्या माध्यमातून पाणीचोरांवर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे.दुष्काळस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हिवाळ्यातच काही गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. मार्चनंतर पाणीटंचाईची दाहकता आणखी वाढेल. त्यामुळे अनिर्बंध पाणी उपसा करणाºयांवर आता पथकाचा ‘वॉच’ राहणार आहे. दंडात्मक कारवाईसह फौजदारीदेखील केली जाणार आहे.दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या निकषानुसार जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुसरा ट्रिगर लागू झाला. शासनाने या तालुक्यांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केली आहे. त्यापैकी मोर्शी तालुक्यात गंभीर स्वरूपाचा, तर अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चिखलदरा व वरूड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे. आता जून ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानापेक्षा ७५ टक्के कमी आणि एकूण पर्जन्यमान ७५० मिमीपेक्षा कमी झाल्याने १६ महसूल मंडळांमध्ये आता दुष्काळस्थिती जाहीर करण्यात आली. यामध्ये अमरावती तालुक्यातील शिराळा व नांदगावपेठ, भातकुली तालुक्यातील पूर्णानगर, आष्टी व आसरा, चांदूर रेल्वे तालुक्यात आमला, तिवसा तालुक्यातील कुऱ्हा, दर्यापूर तालुक्यातील दर्यापूर, सामदा व थिलोरी, चांदूर बाजार तालुक्यातील करजगाव, आसेगाव, तळेगाव व शिरजगाव तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचोली व अंजनसिंगी या मंडळांचा समावेश दुष्काळबाधित यादीत समावेश आहे.भूजल उपशावर नियंत्रण महत्त्वाचेजिल्ह्यातील काही भागातील भूशास्त्रीय व भौगोलिक परिस्थिती तसेच रबी हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा होण्याची शक्यला लक्षात घेता, जलस्रोतावर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रामुख्याने मोर्शी व वरूड तालुक्यात भूजलाचा अनियंत्रित उपसा होत आहे. महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ अन्वये यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. जे तलाव पाणीपुरवठा योजनांचे स्रोत आहेत, त्यांच्या बुडीत क्षेत्रातील विहिरींच्या उपशावर बंदी घालणे आवश्यक आहे.उपशावर बंदीची ‘जीएसडीए’ची शिफारसजिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने १२ तालुक्यांतील भूजलात तूट आली आहे. साधारणपणे ४५५ गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली असल्याने अधिनियमाचे कलम २५ अन्वये टंचाईक्षेत्र जाहीर करणे व ज्या पाणीपुरवठा योजनेचे स्रोत तलावाच्या बुडीत क्षेत्रात आहे, अशा तलावांतील पाणी उपशावर बंदी घालण्याची शिफारस भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात केली आहे.असे राहणार भरारी पथकशासननिर्देशानुसार दुष्काळी भागात अमर्याद पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथक गठित होणार आहे. भरारी पथकात जलसंपदा विभागासह महावितरणचे शाखा अभियंता, मंडळ अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी आदींचा समावेश राहणार आहे. या पथकाद्वारे अनिर्बंध उपसा करणाऱ्यांवर आता दंडात्मक व फौजदारी कारवाई जाईल. या पथकावर जिल्हाधिकाºयांचे मॉनिटरिंग राहणार आहे.