शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वाळू तस्करांकडून दंड वसूल

By admin | Updated: May 15, 2017 00:19 IST

एक एप्रिलपासून सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात तालुक्यातील वाळू तस्करीला आळा घालण्याची स्थानिक महसूल विभागाकडून धडक मोहीम राबविण्यात आली.

महसूल विभागाची कारवाई : १.१० लाख रुपये जमा लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : एक एप्रिलपासून सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात तालुक्यातील वाळू तस्करीला आळा घालण्याची स्थानिक महसूल विभागाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. यात एप्रिल २०१७ या पहिल्याच महिन्यात केलेल्या कारवाईमधून महसूल विभागाने एक लाख १० हजार ४०० रुयाचा महसूल दंडापोटी वसूल केला आहे. हा महसूल नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या ३० दिवसांत वसूल करण्यात आला.या कारवाईत पकडलेल्या पाच वाहनांवर महसूल विभागाकडून अचानक धाड टाकून ही मोहीम राबविण्यात आली. विशेष खबऱ्यांच्या माहितीवरून शिरजगाव कसबा, तळणी पूर्णा, कुरळपूर्णा, फुबगाव इत्यादी ठिकाणच्या नदीघाट मार्गावरून चोरून वाळूची वाहने नेत असताना ही कारवाई करण्यात आली. यामध्ये चार ट्रॅक्टर व एका ट्रकचा समावेश आहे. जप्तीनंतर तस्करीची वाळू भरलेली ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली. त्यानंतर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करून सदर प्रकरणे पुढील आदेशकरिता उपविभागीय अधिकारी महसूल यांचेकडे पाठविण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्वांकडून दंडाची रक्कम वसूल करून त्यानंतर जप्त केलेली वाहने संबंधित मालकांना परत करण्यात आली. ही कारवाई फक्त एप्रिल २०१७ या महिन्यातील आहे.