शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आगामी काळातील तापमानवाढ पिकांना घातक, ‘टेरी’चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 16:42 IST

जिल्ह्यासह विभागात आगामी काळात तापमानवाढ होणार असल्याचा ‘टेरी’चा अहवाल आहे. पिकांसाठी हे वातावरण अत्यंत घातक असल्याने आतापासूनच नियोजन हवे, यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने शेतक-यांसाठी शिफारशी सुचविल्या आहेत.

 

अमरावती : जिल्ह्यासह विभागात आगामी काळात तापमानवाढ होणार असल्याचा ‘टेरी’चा अहवाल आहे. पिकांसाठी हे वातावरण अत्यंत घातक असल्याने आतापासूनच नियोजन हवे, यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने शेतक-यांसाठी शिफारशी सुचविल्या आहेत.शेतक-यांना गावपातळीवरील हवामान व पिकावरील रोगराई तसेच वातावरणाच्या अनियमिततेमध्ये जोखीम व्यवस्थापनासंदर्भात अचूक माहिती व थेट सल्ला पुरविणारी यंत्रणा (अ‍ॅग्रोक्लायमेट सेंटर) विकसित करण्याची शिफारस कृषी विभागाला केली आहे. शेतकºयांना बदलत्या वातावरणास अनुरूप बदलणारी पीकपद्धती व तंत्रज्ञानविषयक माहिती उपलब्ध करून देणे, अशा वातावरणात वाढू शकतील व तग धरू शकणा-या पिकांंच्या व फळांच्या प्रजातीच्या संशोधनास व लागवडीस प्रोत्साहन देणे,  जुन्या पारंपारीक पिकांचे सवंर्धन करणे, सुक्ष्म जलसिंचनास प्रोत्साहन देणे फळबाग नियंत्रण व व्यवस्थापनाबात शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.वातावरणीय बदलामुळे अनियमित पाऊस, तीव्र दुष्काळ, मोठे पूर, जमिनीतील पोषक द्रव्यांचा असमतोल, वॉटर लॉगिंग, अन्न सुरक्षा, रोगराईत होणारी वाढ, जंगलाची वैविधता व ºहास, उत्पादकता, पाण्याची उपलब्धता व उपयुक्तता व मासेमारीवर विपरित परिणाम होत आहे. आकस्मिक अतिवृष्टी होवून पूर येणे किंवा काही ठिकाणी दुष्काळ पडणे अशा घटणांच्या वारंवारतेमध्ये वाढ झाली ही चिंतेची बाब आहे. राज्यातही ‘टेरी’ संस्थेच्या सहकार्याने अशा बदलांमुळे उद्भवणाºया समस्यांना सामोरे जाण्यासठी कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे त्यानुसार क्षेत्रनिहाय अनुकूल धोरण पर्यावरण विभागाद्वारा ठरविण्यात येणार आहे.

उपजिविकेच्या पर्यायी साधनांची निर्मितीया वातावरणीय बदलामुळे उपजिविकेसाठी पर्यायी साधनांची निमिर्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये कुक्कूटपालन, शेळी-मेंढी पालन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सपालनास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.सौर उर्जापंप, पवनउर्जा यासाठी शेतक-यांना उद्युक्त करून शेतीमधील उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहन देऊन पिकांची उत्पादकता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती करून शेतकºयांना प्रशिक्षण व मालास बाजारपेठच्या सुविधा पुरविल्या जाण्यावर भर देण्यात येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती