शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागरचना : वेट अँड वॉच; प्रशासनाला ‘यूडी’चे गायडन्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात विशेष कायदा पारित केला. त्यामुळे राज्यातील १८ महापालिकांसाठी तयार केलेली प्रारूप प्रभागरचना रद्द करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती मिळाली. आता ११ एप्रिल रोजी नगरविकास विभागाने नव्याने प्रभागरचनेसाठी आदेश पारित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीस अनुसरून प्रभाग रचना करावी, असे आदेश नगर विकास विभागाने महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. ११ एप्रिल रोजी ते आदेश आले होते. मात्र, पुढे १४ ते १७ एप्रिल या कालावधीत सुट्या आल्याने १८ एप्रिलपासून प्रभागरचना प्रक्रियेला वेग येईल, असे संकेत होते. मात्र, सोमवारी याबाबत महापालिका प्रशासनाची भूमिका ‘वेट अँड वॉच’ अशी होती. राज्यातील सर्वच महापालिकांनी ११ एप्रिलच्या आदेशाबाबत नगरविकास विभागाशी संपर्क साधला. मात्र, तेथूनही स्पष्ट, असे आदेश मिळाले नाहीत. ते आल्यानंतरच प्रभागरचनेला सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात विशेष कायदा पारित केला. त्यामुळे राज्यातील १८ महापालिकांसाठी तयार केलेली प्रारूप प्रभागरचना रद्द करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती मिळाली. आता ११ एप्रिल रोजी नगरविकास विभागाने नव्याने प्रभागरचनेसाठी आदेश पारित केले. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार, १९४९ मधील अधिनियमानुसार, ज्या महापालिकांची मुदत संपली व संपणार आहे, त्यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जनगणनेनुसार प्रभागरचना करावी. यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या २८ डिसेंबर २०२१ व २७ जानेवारी २०२२ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घ्यावा, असे म्हटले. मात्र, त्यानंतरही महापालिका स्तरावर प्रभागरचनेसाठी कुठल्याही हालचाली नाहीत. महापालिका प्रशासनाला प्रभागरचनेसाठी नगरविकास विभाग वा राज्य शासनाच्या सखोल मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे. महापालिका निवडणुकीबाबत प्रभागरचना नेमकी कशी करायची, याबाबत राज्यस्तरावर एक सर्वसमावेशक अशी ‘फ्रेम’ निश्चित करण्यात येईल. त्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच प्रभागरचनेला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

२१ एप्रिलकडे सरकारचे लक्षओबीसी आरक्षण नसल्याने राज्य सरकारने विधिमंडळात नवीन विधेयकाद्वारे कायदा पारित केला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर २१ एप्रिलला सुनावणी होणार आहे. १८ ते २१ दरम्यान राज्य निवडणूक आयोग व नगरविकास विभागाच्या नव्या आदेशाकडेदेखील प्रशासनाचे लक्ष लागले आहे. नगरविकास विभागदेखील २१ एप्रिलच्या पुढेच प्रभागरचनेसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना करणारा आदेश काढू शकते, असे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे. 

 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जाती