शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वाँटेड दरोडेखोर तलवारसिंग राजापेठ पोलिसांकडून ट्रॅप

By प्रदीप भाकरे | Updated: July 17, 2025 17:26 IST

शंभरावर गुन्हे दाखल : दहा वर्षांपासून यंत्रणेला देत होता गुंगारा, अकोला जिल्ह्यातून अटक

अमरावती : शहर आयुक्तालयासह राज्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरी, रॉबरी, दरोडा, खून व खुनाचा प्रयत्न असे शेकडो गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात आरोपीला राजापेठ पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील त्याच्या नायगाव या राहत्या घरातून अटक केली. १७ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. अब्दुल रशीद ऊर्फ तलवारसिंग अब्दुल हमीद (रा. नायगांव, मेहबुबिया मशीदजवळ, अकोला) असे अटक कुख्याताचे नाव आहे.           

तलवारसिंग म्हणून गुन्हेगारी जगतात कुप्रसिद्ध असलेल्या अ. रशीदविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलीकडे शहर आयुक्तालयसह वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर व रेल्वे पोलिस त्याच्या मागावर होते. त्याच्याविरुद्ध शेकडोच्या संख्येने गुन्हे दाखल असल्याने तो दहा वर्षांपासून न्यायालयीन तारखेवरदेखील हजर राहत नव्हता. त्यामुळे विविध पोलिस ठाण्यांत त्याच्याविरुद्ध पकड वारंट, प्रोक्लामेशन वॉरंटदेखील प्राप्त झाले आहेत. त्याला न्यायालयाने फरारसुद्धा घोषित केले आहे.

एक पाय घरात, दुसरा जेलमध्येआरोपी तलवारसिंग हा अट्टल व सराईत चोर असल्याने तो चोरीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत फिरत असतो किंवा कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामध्ये जेलमधे असतो. त्यामुळे तो त्याच्या राहत्या घरी नायगाव येथे मिळून येत नव्हता. दरम्यान, १६ जुलै रोजी तो नायगाव परिसरात वावरत असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली. तत्क्षणी राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांनी हवालदार आशिष विघे, विक्रम देशमुख, जगदीश वानखडे, सतीश टपके, आबिद शेख, पूजा चंदनपत्री व विजय यादव यांना तातडीने अकोल्यात रवाना केले. वारंट पथकाने त्याला ताब्यात घेऊन राजापेठेत आणले. तलवारसिंग याला राजापेठ पोलिस ठाण्यात सन २०१८ मध्ये नोंद चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

टॅग्स :AmravatiअमरावतीArrestअटक