अमरावती : अनलॉकनंतरही कोरोनावर काही अंशी नियंत्रण मिळाले आहे. रेल्वे गाड्याही पूर्वपदावर आल्या असून, रेल्वेची मासिक पास सुरू करण्यात न आल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे मासिक पास सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी नियमित प्रवाशांकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी आहे.
कोरोना काळात पॅसेंजर, लोकल व नियमित रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोरोना आटोक्यात आलेला आहे. सर्वच कर्मचारी, अधिकाऱ्यांनी लसीकरण पूर्ण केले असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यतादेखील नाही. इतर राज्यात सवारी गाड्या सुरू केल्या असून जनरल तिकिटांचीही सेवा सुरू आहे. नागपूर, भुसावळ, अकोला, अमरावती, वर्धा आदी ठिकाणी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना दररोज आरक्षणाचे आगाऊ तिकीट काढून प्रवास करावा लागत असल्याने मासिक पास सुरू करण्याची मागणी आहे.
----------------
बॉक्स
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
- पुणे ते हावडा स्पेशल
- नागपूर ते पुणे स्पेशल
- गोंदिया ते कोल्हापूर स्पेशल
- अहमदाबाद ते हावडा स्पेशल
-मुंबई ते हावडा स्पेशल
------------
बॉक्स्
मुंबईत सवलत आम्हाला का नाही?
रेल्वे विभागाने काही राज्यांप्रमाणे मुंबईतही लोकल प्रवासासाठी दोन लस घेतलेल्यांना मासिक पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विदर्भातही ही सेवा सुरू करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. रेल्वे विभागाने याची दखल घेण्याची मागणी प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
--------------
कोट
मासिक पास बंद असल्याने नियमित प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. अनेक रेल्वेस्थानकावर मासिक पास सुरू करण्यात आली आहे. मात्र, विदर्भात ही सेवा बंद असल्याने भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाने दखल घेण्याची गरज आहे.
- राजेश सपकाळे, प्रवासी.
विदर्भात कोरोना आटोक्यात आला असूनही मासिक पासची सवलत का दिली जात नाही, हा प्रश्न आहे. पॅसेंजर वगळता सर्वच रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मासिक पास लवकर सुरू करावी, अशी प्रवाशांकडून केली जात आहे.
- संजय देशमुख, प्रवासी.