शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:24 IST

जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाल्याने काही भागांतील पिकांना दिलासा मिळाला असला तरी दुबार पेरणीचे संकट कायम आहे. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

ठळक मुद्देहलक्या, मध्यम पावसाची नोंद : दुबार पेरणीचे संकट कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाल्याने काही भागांतील पिकांना दिलासा मिळाला असला तरी दुबार पेरणीचे संकट कायम आहे. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १९.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये ३१ महसूल मंडळांमध्ये २० ते ५५ मिमीपर्यंत पाऊस झाला. या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील पिकांना उभारीवर दुबारचे संकट आहे. जिल्ह्यात २४ जून रोजी पावसाचे आगमन झाल्यावर पाच दिवसांचा खंड राहिला. त्यानंतर २ जून रोजी आगमन झाल्यानंतर १७ दिवस पावसाची दडी राहिल्याने जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या, तर ज्या क्षेत्रात पेरण्या झाल्यात त्यापैकी तीन लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट असताना दोन दिवसांपासून आलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. मात्र, त्यापैकी उशिरा पेरणी झालेल्या किमान एक लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट कायम आहे.शनिवारी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात पावसाची नोंद झाली. यामध्ये अमरावती महसूल मंडळात ३९, बडनेरा ४४, वडाळी ४६, नवसारी ४२, वलगाव ४३, शिराळा २२, माहुली ५९.३, भातकुली २२.४, खोलापूर २१.२, निंभा २३.४, दाभा ५२.४, चांदूर रेल्वे ४९, आमला ३४.६, घुईखेड ४३, सातेफळ ५६.३, पळसखेड ४२, धामणगाव रेल्वे ४२.४, अंजनसिंगी २२.३, तळेगाव दशासर ५७, तिवसा २०.६, मोझरी २४, असदपूर २२.२, दारापूर २४.२, खल्लार २४.८, रामतिर्थ ४२, अंजनगाव सुर्जी ४२, भंडारज २९, विहीगाव ३०, कोकर्डा २५, सेमाडोह ४९, तर चिखलदरा तालुक्यातील चुरणी मंडळात ५०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.भातकुली, वरूडमध्ये ३७ च्या आत टक्केवारीजिल्ह्यात आतापर्यंत ३३३.३ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १८४.४ मिमी पावसाची नोंद झाली. ही ५५.३ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वात कमी वरूड तालुक्यात ३३.८ टक्के व भातकुली तालुक्यात ३६.९ टक्के पाऊस पडला. पावसाअभावी या तालुक्यात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अमरावती ७१.२, नांदगाव खंडेश्वर ४७.१, चांदूर रेल्वे ६७.९, धामणगाव रेल्वे ६३.३,तिवसा ४४.२, मोर्शी ४३.१, अचलपूर ६३.२, चांदूर बाजार ४५.३, दर्यापूर ४५.३, अंजनगाव सुर्जी ५१.४, धारणी ७८.३ व चिखलदरा तालुक्यात ६१.८ टक्के पावसाची नोंद झाली.

टॅग्स :Rainपाऊस