लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू असल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या, तर बीजांकुरही करपायला लागल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात खरिपाची ८० टक्क््यांपर्यंत पेरणी झालेली आहे. यामध्ये तिवसा व वरूड तालुक्यात सर्वाधिक ९० टक्क्यांवर, तर अमरावती व दर्यापूर तालुक्यात ५० टक्क्यांवरच पेरणी रखडली.रोहिणीत मान्सूनपूर्व व लगेच मृगधारा कोसळल्याने खरिपासाठी शेतकऱ्यांनी दोन आठवड्यांपासून पेरणी सुरू केली. मात्र, यादरम्यान पावसाचा लपंडाच व काही ठिकाणी पाऊस गायब असल्याने पिके कोमेजायला लागली आहेत. दिवसाच्या कडक उन्हात बिजांकूर करपायला लागले आहे. वांझोट्या बियाण्यांमुळे काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. तेथील दुबार पेरणीदेखील मोडीत निघणार का, ही भीती शेतकऱ्यांमध्ये निर्मांण झालेली आहे.संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे ओलीत करण्यात येत असले तरी जिरायती क्षेत्रात मात्र पिकांची स्थिती बिकट झाली आहे. जिल्ह्यात प्रस्तावित सहा लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सद्यस्थितीत ५ लाख ४५ हजार ६५७ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपलेली आहे. ही टक्केवारी ७९.२८ आहे. यामध्ये ज्वारीची ११ हजार ९८ हेक्टरवर, मक्याची ९ हजार ३९९ हेक्टरवर, तुरीची ८२ हजार २३७ हेक्टरवर, मुगाची ११ हजार ९६३ हेक्टरवर, उडिदाची २ हजार ७९६ हेक्टरवर, सोयाबीनचे २ लाख १४ हजार ६८६ हेक्टरवर व कपाशीची २ लाख ९ हजार १८३ हेक्टरवर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.अशी आहे तालुकानिहाय पेरणीजिल्ह्यात सद्यस्थितीत धारणी तालुक्यात ३१८४५ हेक्टर, चिखलदरा १२५५८ हेक्टर, अमरावती ४१३४८ हेक्टर, भातकुली ३९३५७ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६२३६२ हेक्टर, चांदूर रेल्वे २८७५७ हेक्टर, तिवसा ३९३९० हेक्टर, मोर्शी ५२५३१ हेक्टर, वरुड ४६८३६ हेक्टर, दर्यापूर ३७५८४ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ३५५१० हेक्टर, अचलपूर ३४,४९३ हेक्टर, चांदूर बाजार ३७८७८ हेक्टर व धामणगाव तालुक्यात ४५,०३६ हेक्टरमध्ये खरिपातील विविध पिकांची पेरणी झाली आहे.तालुकानिहाय झालेला पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत १८२.४८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यात १३६.९० मिमी, चिखलदरा २१५ मिमी, अमरावती १६३ मिमी, भातकुली १७६ मिंमी, नांदगाव खंडेश्वर ३०२ मिमी, चांदूर रेल्वे १८९ मिमी, तिवसा १५० मिमी, मोर्शी २०६ मिमी, वरुड २६३ मिमी, दर्यापूर १५४ मिमी, अंजनगाव सुर्जी १७९ मिमी, अचलपूर १३४ मिमी, चांदूर बाजार २०६ मिमी व धामणगाव तालुक्यात १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोवळ्या पिकांनी टाकल्या माना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:01 IST
रोहिणीत मान्सूनपूर्व व लगेच मृगधारा कोसळल्याने खरिपासाठी शेतकऱ्यांनी दोन आठवड्यांपासून पेरणी सुरू केली. मात्र, यादरम्यान पावसाचा लपंडाच व काही ठिकाणी पाऊस गायब असल्याने पिके कोमेजायला लागली आहेत. दिवसाच्या कडक उन्हात बिजांकूर करपायला लागले आहे. वांझोट्या बियाण्यांमुळे काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. तेथील दुबार पेरणीदेखील मोडीत निघणार का, ही भीती शेतकऱ्यांमध्ये निर्मांण झालेली आहे.
कोवळ्या पिकांनी टाकल्या माना
ठळक मुद्देबिजांकूर करपले : पावसाचा लपंडाव, अमरावती, दर्यापुरात माघारली पेरणी