शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

११ केंद्रांवर चणा खरेदीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 01:24 IST

चणा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक नाडवणूक टाळण्यासाठी नाफेडच्यावतीने नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आली खरी; तथापि अद्यापही अचलपूर वगळता ११ केंद्रांवर चणा खरेदीस सुरुवात करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देकेवळ अचलपुरात सुरुवात : आॅनलाईन नोंदणी ९३०० क्विंटलवर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चणा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक नाडवणूक टाळण्यासाठी नाफेडच्यावतीने नोंदणी व खरेदी केंद्र सुरू करण्यात आली खरी; तथापि अद्यापही अचलपूर वगळता ११ केंद्रांवर चणा खरेदीस सुरुवात करण्यात आलेली नाही. तुरीचा मोबदला अद्याप मिळाला नाही आणि चण्याचे माप झाले नसल्याने तोंडावर आलेला लग्नाचा हंगाम पार कसा पाडायचा, अशी विवंचना शेतकऱ्यांसमक्ष उभी ठाकली आहे.चण्याची आॅनलाईन नोंदणी करून शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील अचलपूर, दर्यापूर, तिवसा, धारणी, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरूड, धामणगाव रेल्वे, अमरावती व चांदूरबाजार या तालुक्यांच्या ठिकाणी खरेदी-विक्री संघामार्फत १२ केंद्रे सुरू करण्यात आली. महारष्टÑ राज्य सहकारी पणन महासंघ, अमरावती ( डीएमओ) व दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, अमरावती या दोन संस्थांद्वारे ही केंदे्र १४ ते १८ मार्च दरम्यान सुरू करण्यात आली. २८ मार्चपर्यंत अचलपूर केंद्रावर १०९८, दर्यापूरमध्ये १०४४, तिवसा येथे ७३१, धारणी येथे १६४, चांदूररेल्वेत १२७३, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर ७५९, अंजनगाव सुर्जी केंद्रावर १५३० शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली, तर दि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, अमरावतीमार्फत सुरू करण्यात आलेल्या मोर्शी केंद्रावर ५८३, वरूडमध्ये ४७३, धामणगाव रेल्वेमध्ये ६७०, अमरावतीमध्ये ४२६ व चांदूर बाजार खरेदी केंद्रावर ५९१ अशा एकूण ९३४२ शेतकऱ्यांच्या चण्याची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. मात्र, अचलपूर खरेदी केंद्रावर ३० मार्चपर्यंत झालेल्या २१ शेतकऱ्यांच्या ४०४ क्विंटल चण्याव्यतिरिक्त अन्य ११ केंद्रांवर नोंदणीवरच शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. १२ खरेदी केंद्रांवर ३० मार्चपर्यत ९३४२ नोंदणी असताना, केवळ २१ शेतकऱ्यांच्या चण्याचे माप करण्यात आले. त्यामुळे तुरीप्रमाणे चणा उत्पादक शेतकऱ्यांनाही खरेदी व मोबदल्यासाठी वर्षभराची प्रतीक्षा करावी तर लागणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.तुरीची खरेदी रखडलीचणा खरेदीचा निव्वळ बागुलबुवा केला जात असताना, तब्बल २६ हजार शेतकºयांच्या तुरीचे माप व खरेदी रखडली आहे. जिल्ह्यातील १२ केंद्रांवर २० मार्चपर्यंत एकूण ३३ हजार २ शेतकऱ्यांनी त्यांच्या तुरीची आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र, ३० मार्चपर्यंत त्यापैकी केवळ ६९२२ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ७०९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. त्यामुळे आमच्या तुरीचे माप केव्हा, असा २६ हजार शेतकऱ्यांचा आर्त सवाल आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड