शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

‘त्या’ अपंगांना पालिका संकुलातील गाळ्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: May 26, 2015 00:24 IST

मोर्शी मार्गावर नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून दुकाने बांधली. यातील तीन टक्के दुकाने अपंगांना देण्यात ...

निर्णय केव्हा? : २० अर्ज दाखल, दीड वर्षांपासून फक्त टोलवाटोलवी चांदूरबाजार : मोर्शी मार्गावर नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून दुकाने बांधली. यातील तीन टक्के दुकाने अपंगांना देण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.चांदूरबाजार शहरात १४४ अपंग असल्याची नोंद पालिका कार्यालयात असून यापैकी २० अपंगांनी न.प. मार्फत वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ५२ लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या २६ गाळ्यांपैकी एक गाळा मिळण्यास आपले अर्ज २८ नोव्हेंबर २०१३ रोजी न.प.ला दिले. यात वसीम अली हफीज अली, जमरुन बी शहादत खां, अ.रहेमान अ. कादर, मो. आसीफ रसूल पटेल, धनंजय बबनराव खंडारे, जमीर अहेमद बशीर अहेमद, ललिता बद्रीप्रसाद पालीवाल, शबाना परवीन जावेद इकबाल, अत्ताउल्लाखान सरफराज खान, हेमंत शालिकराम कोठाळे, फिरोज खान हसन खान, तुळशीराम तायवाडे, प्यारे खान नसीर खान, शे. अनिस शे. इस्माईल, देवेंद्र चव्हाण, नरेंद्र वर्मा, शगुणा परवीन अ. रफीक, समीर खान अहेमद खान, मुख्त्यार अहेमद खान, शालिनी शेळके यांनी दीड वर्षांपासून अर्ज दिलेले आहेत. त्यांना गाळे मिळण्याची प्रतीक्षा आहे. चांदूरबाजार नगरपालिकेने ३ जून २०१४ रोजी घेतलेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. १९३ प्रमाणे नगरपरिषद क्षेत्रातील अशा व अपंगांना मालमत्ता करामध्ये २० टक्के सवलत देण्याचे पारित केले होते. मात्र या ठरावाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसून एकाही अपंगाला २० टक्के सूट देण्यात आलेली नाही. (तालुका प्रतिनिधी)२० पैकी एका अपंगाचे झाले निधनचांदूरबाजार नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ५२ लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या २६ गाळ्यांचे २९ नोव्हेंबर २०१३ रोजी लिलाव करण्यात आले. या गाळे विक्रीतून महापालिकेला जवळपास अडीच कोटी रुपये प्राप्त झाले. तेव्हापासून अपंगांना राखीव गाळे अध्यापपर्यंत मिळालेले नाहीत. यात २० अर्जदारांपैकी एका विवाहित अपंगाचे विद्युत शॉक लागून निधन झाले. त्याची पत्नी व तीन मुले आजही आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत.मुख्याधिकारी म्हणून मला रुजू होऊन एकच महिना झाला आहे. सभागृहाने अपंगांना गाळे देण्यासंबंधीच्या ठरावाची माहिती घेऊन अपंगांना न्याय देण्यात येईल.- मेघना वासनकर,मुख्याधिकारी, चांदूरबाजार.