शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सात प्रादेशिक वन विभागांत ‘डीएफओं’ची प्रतीक्षा; हेविवेट जागांवर नियुक्ती कुणाची?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 20:42 IST

या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे नजरा लागल्या आहेत.

अमरावती : राज्याच्या महसूल व वनविभागाने भारतीय वनसेवेतील तब्बल ५३ अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, प्रादेशिक वनविभागात हेविवेट सात जागांवर अद्यापही आयएफएस उपवनसंरक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे नजरा लागल्या आहेत.यात नंदूरबार जिल्ह्यातील यावल, जळगाव, धुळे, बुलडाणा, अमरावती, ब्रह्मपुरी, पांढरकवडा या सात प्रादेशिक वनविभागात डीएफओंच्या नियुक्तीची प्रतीक्षा आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. शिवबाला एस. यांची बदली करण्यात आली. पण त्यांची नियुक्ती कुठेही झाली नाही. तेसुद्धा नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. बुलडाणा प्रादेशिक वनविभागात अतिक्रमणाची मोठी समस्या असताना येथे उपवनसंरक्षकांची नियुक्ती नाही. पांढरकवडा प्रादेशिक वनविभागात वाघांचे वास्तव्य आहे. येथून सीमेवर आंध्र प्रदेशातून तस्करीची भीती असताना पांढरकवडा येथे डीएफओंची नियुक्ती करण्यात आली नाही.पांढरकवडा हे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या गृहक्षेत्रातील आहे. येथे उपवनसंरक्षकांची नियुक्ती न होणे आश्चर्यकारक मानले जात आहे. अमरावतीचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची मंत्रालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली. परंतु, नरवणे यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती झाली नाही. १५ ऑगस्टनंतर डीएफओंच्या बदल्यांची ही यादी जाहीर होईल, असे संकेत आहे. 

पाच विभागीय वनाधिका-यांच्या बदल्यामहसूल व वनविभागाने गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी पाच विभागीय वनाधिकारी (गट अ) यांच्या विनंती अर्जावर बदल्या केल्या आहेत. यात एम.एन. खैरनार (अमरावती), एम.के. गोखले (नागपूर), व्ही.एन. सातपुते (औरंगाबाद), पी.व्ही. जगत (औरंगाबाद), बी.ए. पोळ (पुणे) यांचा समावेश आहे.