शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

दीड लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:24 IST

शासकीय तूर खरेदी केंद्र शनिवारनंतर बंद होणार, म्हणून सर्वच दहा केंद्रांवर तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली.

२२ नंतर पुन्हा केंद्र बंद : व्यापाऱ्यांच्या तुरीवर महसूल विभागाची करडी नजरअमरावती : शासकीय तूर खरेदी केंद्र शनिवारनंतर बंद होणार, म्हणून सर्वच दहा केंद्रांवर तुरीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. सोमवारी या केंद्रांना २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले. सद्यस्थितीत या केंद्रावर एक लाख ४१ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचा माल आहे काय? हे तपासणीसाठी महसूल विभागाचे पथक कामाला लागले आहे.जिल्ह्यात दहा केंद्रांवर शासकीय तूर खरेदी सुरू आहे. यामध्ये व्हीसीएमएसद्वारा चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर व मोर्शी, एफसीआयद्वारा अमरावती व धामणगाव रेल्वे तसेच डीएमओद्वारा अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, दर्यापूर व वरूड येथे केंद्र सुरू आहे. केंद्र शासनाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार १५ एप्रिल रोजी सर्व केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे केंद्र बंद होणार असल्याने शेतकऱ्यांनी भरपूर तूर विक्रीसाठी आणली व विहित मुदतीत आलेली सर्व तूर खरेदी करण्यात येईल, असे केंद्राद्वारा जाहीर करण्यात आले. त्यामुळे शनिवारपर्यंत तुरीची आवक वाढली व सद्यस्थितीत दीड लाख क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.सद्यस्थितीत व्हीसीएमएफद्वारा सुरू असलेल्या चांदूररेल्वे केंद्रावर ४०००, नांदगाव खंडेश्वर २५००, मोर्शी येथे १० हजार तुरीचे पोते मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. एफसीआयद्वारा अमरावती केंद्रावर ४० हजार, धामणगाव केंद्रावर ५०००, तसेच डीएमओद्वारा अचलपूर केंद्रावर १८०००, अंजनगाव सुर्जी १३०००, चांदूरबाजार ७०००, दर्यापूर २५००० व वरूड केंद्रावर २२००० तुरीची पोते मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी)केंद्रांसाठी संबंधित एसडीओ समन्वय अधिकारीशासकीय तूर खरेदी केंद्रावर विविध समस्या निर्माण होतात. त्या सोडविण्यासाठी व खरेदी सुरळीत सुरू ठेवण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्ती केली आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रजिल्ह्यातील दहाही शासकीय तूर खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर तुरीचा माल मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. अशा स्थितीत १५ एप्रिलला केंद्र बंद झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व केंद्रांना मुदतवाढ द्यावी, असे पत्र जिल्हाधिकारी के.पी.परदेशी यांनी पणन् विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना यापूर्वीच पाठविले होते. डीएमओ अंतर्गत सुरू असलेल्या ५ केंद्रांवर सद्यस्थितीत ८० हजार पोते मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज सहा हजारांवर क्विंटलची मोजणी करण्यात येते.- अशोक देशमुखजिल्हा मार्केटिंग अधिकारीव्हीसीएमएफ व एफसीआयच्या पाच केंद्रांना २२ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे पत्र सोमवारी प्राप्त झाले. यासर्व केंद्रावर ६१ हजार पोत्यांची मोजणी व्हायची आहे. आमचा प्रयत्न सुरू आहे.- राजेश विधळेव्यवस्थापक, व्हीसीएमएफ.