शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
2
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
3
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
4
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
6
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
7
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
8
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
9
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
10
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
11
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
12
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
13
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
14
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
15
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
16
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
17
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
18
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
19
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
20
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...

कापसाला ६ हजार रूपये क्विंटल दराची प्रतिक्षा

By admin | Updated: March 1, 2017 00:02 IST

खरीप हंगामाच्या शेवटी पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ होईल, ही शक्यता फेब्रुवारीच्या अखेरीस मावळली आहे.

कापूस घरीच : ५,७०० वर स्थिरावला दरअमरावती: खरीप हंगामाच्या शेवटी पांढऱ्या सोन्याच्या दरात वाढ होईल, ही शक्यता फेब्रुवारीच्या अखेरीस मावळली आहे. जिल्ह्याचा विचार करता शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही हजारो क्विंटल विक्री विना पडला असून शेतकऱ्यांना २०० ते ३०० प्रतिक्विंटल दर वाढीची अपेक्षा आहे. तुर्तास खुल्या बाजारात कापसाचा प्रतिक्विंटल दर ५ हजार २०० ते ५ हजार ७०० आसपास आहे.यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने कापसाचे उत्पादन वाढेल तदवतच दरामध्येही वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त होऊ लागली होती.कापसाचे सरासरी उत्पादन वाढले खरे मात्र दरात अपेक्षेनुरूप वाढ झाली नाही. यंदा सहा हजारावर पोहचेल अशी अपेक्षा होती.तथापी २८ फेब्रुवारी ला अमरावती शहर बाजारात कापसाची खरेदी प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रूपयांनी करण्यात आली.यात सुमारे दोनशे ते अडीचशे रूपयाची वाढ अपेक्षीत आहे.कापसाचे दर वाढतील या अपेक्षेने ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या हाती येत असलेला कापसाचा दर हमी भावापेक्षा अधिक असल्याने यंदा ओरड झाली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी ५ हजार ९०० रूपया प्रमाणे कापूस विकला आहे.५ हजार ९०० रूपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या भाव वाढीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढण्याची अपेक्षा कापूस विक्रीला ब्रेक दिला आहे.ही तेजी आणखी किती दिवस राहील याचा नेम नाही. यामुळे असलेला भाव पुन्हा वाढेल कि पडेल या बाबतहीसाशंकता आहे. परिणामी शेतकऱ्यांनी कापसाला सहा हजार रूपये दराची अपेक्षा अद्याप तरी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. खासगीत सध्या कापसाला ५ हजार ८०० रूपये दर आहे. कापसाची कमी भावात विक्री यंदा कापसाचे पीक समाधानकारक झाले आहे. शेतकऱ्यांना पैशाचीचणचण असल्यामुळे त्यांची अडचण लक्षात घेत व्यापारी अगदी कमी भावात कापुस खरेदी करित आहेत. जिल्ह्यात शासकीय कापुस खरेदी केंद्रही कमी आहेत. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना घरून कापुस विकतात. शेतकऱ्याकडून घेतलेला कापूस ५,२०० ते ५, ५०० रूपयात घेतलेला कापूस बाजारात यापेक्षाही चढयादराने विकतात त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गळचेपी होत आहे. सध्या कापसाला सध्या असलेला ५ हजार ८०० रूपये भाव हमीभावा पेक्षा उत्तम आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकावा.उन्हाळा सुरू झाल्याने कापसातील ओलावा कमी होवून वजन घटणार आहे. त्यामुळे भविष्यात भाव वाढले तरी आर्थिक नुकसान होऊ शकते.- एन.पी. हिराणीअध्यक्ष, कापूृस पणन महासंघशासकीय खरेदी शून्यबाजारात कापसाला मिळत असलेला दर हमीभावापेक्षा अधिक आहे. यामुळे शासकीय खरेदीला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी कापूस पणन महासंघ आणि सीसीआयची खरेदी अवघ्या काही क्विंटलवर स्थिरावली आहे.घराघरात कापसाच्या गंज्याजिल्ह्यातील काही सधन शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतिक्षेत कापुस अद्याप घरीच ठेवला आहे. त्यांना कापसाला येत्या दिवसात सहा हजार रूपये दर मिळतील अशी अपेक्षा आहे.