शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाला मृत्यूची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

बडनेरा उपविभाग अंतर्गत येणारा बडनेरा ते यवतमाळ राज्य महामार्ग जिल्ह्याच्या सीमापर्यंत ३५ किमी आहे. या अंतरावर हजारो खड्डे आहेत. विशेष म्हणजे, माहुली चोर ते शिवणी मार्गावर मधोमध दोन फुटांचे खोल खड्डे आहे. या मार्गाने खेड्यापाड्यातून ग्रामस्थ कामासाठी अमरावतीत येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने या मार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य न दाखविले नाही. यंदाही भलेमोठे खड्डे ‘जैसे थे’ आहेत. या मार्गाने चारचाकी चालकांनाही मणके सांभाळूनच प्रवास करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा ते यवतमाळ राज्य मार्ग कमालीचा खड्डेमय झाला असून मोठे भगदाड पडलेल्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. या मार्गावर प्रवाशांना मरयातना व अपघाताची मालिका सुरूच आहे.बडनेरा उपविभाग अंतर्गत येणारा बडनेरा ते यवतमाळ राज्य महामार्ग जिल्ह्याच्या सीमापर्यंत ३५ किमी आहे. या अंतरावर हजारो खड्डे आहेत. विशेष म्हणजे, माहुली चोर ते शिवणी मार्गावर मधोमध दोन फुटांचे खोल खड्डे आहे. या मार्गाने खेड्यापाड्यातून ग्रामस्थ कामासाठी अमरावतीत येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम विभागाने या मार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य न दाखविले नाही. यंदाही भलेमोठे खड्डे ‘जैसे थे’ आहेत. या मार्गाने चारचाकी चालकांनाही मणके सांभाळूनच प्रवास करावा लागत आहे.

खड्डे भरणार केव्हा? नवीन रस्त्याचे स्वप्न सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता दाखवित असले तरी अद्याप निधी मिळालेला नाही. किमान मोठे खड्डे डांबराने भरण्याचे सौजन्यही दाखविले गेले नाही. दुसरीकडे नेर उपविभाग हद्दीत शिवणी सीमा ते यवतमाळपर्यंत रस्ता चकाचक आहे.  अमरावती जिल्हा सीमेत जवळा फाटापर्यंत डागडुजी बडनेरा उपविभाग का करीत नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

डागडुजीचा निधी कुठे? दरवर्षी रस्त्यावरील खड्डे भरणे, बाजूचे गवत कापणे, नाल्या काढणे याकरिता निधी मिळते. मात्र, यवतमाळ मार्गावर हे अनुदान मिळाले नसल्याचे कारण पुढे केले जाते. खड्ड्यात रस्ता की रस्तात खड्डे, अशी गंभीर अवस्था बडनेरा ते  शिवणीपर्यंत झाली आहे. ग्रामस्थ रस्त्याच्या दुरवस्थेने कमालीचे चिडून आहेत.

अभियंते बिनधास्तयवतमाळ मार्गावर खड्ड्यातून रस्ता शोधावा लागतो. तब्बल दोन वर्षांपासून ना रस्ता दुरुस्ती, ना डांबरीकरण झाले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठा अपघात होऊन लोकांच्या मरणाची वाट तर बघत नाही, असा सवाल माहुली चोर, धानोरा गुरव, सावंगा, नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापूरचे नागरिक करीत आहेत.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभाग