शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रायबल’ अमरावती अपर आयुक्तांच्या खुर्चीसाठी ‘वेट ॲण्ड वॉच’; ‘मॅट’च्या निर्णयाकडे लक्ष

By गणेश वासनिक | Updated: May 5, 2023 18:59 IST

Amravati News आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी प्रशासकीय बदलीला आव्हान देत ‘मॅट’मध्ये धाव घेतली. आता याप्रकरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॅटने तारीख दिली असृून, राज्य शासनाकडून ‘से’ दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.

गणेश वासनिक अमरावती : आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी प्रशासकीय बदलीला आव्हान देत ‘मॅट’मध्ये धाव घेतली. त्यानंतर २८ एप्रिल २०२३ रोजी वानखेडे यांच्या बदलीला ‘मॅट’ने स्थगनादेश दिला. आता याप्रकरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मॅटने तारीख दिली असृून, राज्य शासनाकडून ‘से’ दाखल होण्याची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे एटीसींचा एकतर्फा पदभार स्वीकारणाऱ्या चंचल पाटील खुर्ची कधी मिळेल, यासाठी त्या ‘वेट ॲण्ड वॉच’ आहेत. हल्ली एटीसी पदाचा कारभार सुरेश वानखेडे सांभाळत आहेत.

सुरेश वानखेडे यांची प्रशासकीय कारणास्तव अचानक दीड वर्षातच यवतमाळ येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली. मात्र, या बदली आदेशाला वानखेडे यांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले आणि २८ एप्रिल रोजी स्टेदेखील मिळविला. ‘मॅट’ने ३ मे रोजी तारखेवर सुनावणी घेतली असून, राज्य शासन, ट्रायबल आयुक्तांना ‘से’ दाखल करण्यासाठी नोटीस बजावल्याची माहिती आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ‘मॅट’मध्ये निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे की चंचल पाटील? याचा फैसला हाेणार आहे. मात्र, २८ एप्रिलपासून एटीसींचा संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे, हे विशेष.कोण आहेत चंचल पाटील?आदिवासी विकास विभागाने अमरावतीच्या अपर आयुक्तपदी चंचल पाटील यांची नियुक्ती केली आहे. पाटील या सातारा येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. २१ एप्रिल रोजी चंचल पाटील यांनी एटीसींचा पदभार स्वीकारला आणि तासाभरातच अमरावतीहून साताराकडे रवाना झाल्या होत्या. ‘मॅट’च्या स्थगनादेशामुळे पाटील यांना एटीसी पदाचा कारभार हाताळता येत नाही.

टॅग्स :Governmentसरकार