शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांच्या शवविच्छेदनाला १६ तास प्रतीक्षा

By admin | Updated: May 30, 2017 00:02 IST

पुरते जगही न पाहिलेल्या त्या तिन्ही मृत शिशुंना सोमवारी पहाटे पाच वाजता इर्विनच्या शवविच्छेदन गृहात आणले गेले.

अक्षम्य अवहेलना : अकोल्याच्या डॉक्टरांची चमू पोहोचली रात्री ८.३० वाजतावैभव बाबरेकर/वर्षा वैजापूरकर । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुरते जगही न पाहिलेल्या त्या तिन्ही मृत शिशुंना सोमवारी पहाटे पाच वाजता इर्विनच्या शवविच्छेदन गृहात आणले गेले. अकोल्याहून बोलविलेली विशेष डॉक्टरांची चमू त्यांचे विच्छेदन करणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत ती चमूच शहरात न पोहोचल्याने चिमुकल्यांच्या मृतदेहांनाही शवविच्छेदनासाठी तब्बल १६ तास प्रतीक्षा करावी लागली.काळजाच्या तुकड्याच्या मृत्युमुळे आधीच शोकसागरात बुडालेले त्या चिमुरड्यांचे आप्त दिरंगाईने अधिकच हैराण झाले होते. मातांचा आक्रोश थांबता थांबत नव्हता. पोस्टमार्टमनंतर आपल्या मुलांना शेवटचे पाहण्यासाठी त्या आसुसल्या होत्या. त्यासाठी शवविच्छेदनगृहासमोर नातलग ताटकळले होते. जन्मल्यानंतर लगेच टपून बसलेला मृत्यू आणि मृत्युनंतरही आपल्या मुलांची सुरू असलेली अवहेलना पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणवले होते. मिळणार होती सुटी, आला मृत्यू !सोमवारी रूग्णालयातून सुटी होणार आणि आपल्या चिमुरड्यांना घेऊन घरी जाणार, या आनंदात त्यांनी सामान बांधून ठेवले. एकदा का घरी गेलो की मग आपल्या पोटच्या गोळ्यांचे मनमुराद कोडकौतुक करायचे, बाळांचा कायमस्वरुपी विरहअमरावती : इतरांकडूनही करून घ्यायचे, त्यांची प्रत्येक हालचाल टिपायची, त्यांचे हसू डोळ्यांत साठवायचे, अशी एक ना अनेक स्वप्ने उराशी घेऊन त्या नवप्रसूता झोपी गेल्या. निजण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या काळजाच्या तुकड्याला दूधही पाजले. पण, अवघ्या अर्ध्या तासात काळाने कुठाराघात केला. काही वेळापूर्वी हसत-खेळत असलेले चिमुरडे शिशू मृत्युच्या दाढेत गेले. नेमके काय झाले, कळेचना. मातृत्वाचा उत्सव निट साजरा होत नाही तोच त्या चारही मातांची कुस उद्धवस्त झाली. उरला फक्त आक्रोश, वेदनांचा चिरदाह आणि अश्रुंचे न आटणारे पाट. सोमवारी पीडीएमसीतील हे विदारक दृश्य पाहणारा प्रत्येक जण हादरून गेला. मातृत्व म्हणजे स्त्रित्वाचा परमोच्चबिंदू. आई झाल्याशिवाय स्त्रीला पूर्णत्व येत नाही, असे म्हणतात. त्यामुळेच प्रत्येक विवाहिता ‘मातृत्वा’साठी आसुसलेली असते. गर्भधारणेपासून हा उत्सव ती साजरा करीत असते. पोटातील बाळाची प्रत्येक हालचाल, त्याची स्पंदने ती अनुभवते. असह्य प्रसववेणा सोसून जेव्हा बाळाचा जन्म होतो, तेव्हा त्याचे पहिले रडणे ऐकण्यासाठी तिचे प्राण कानात एकवटले असतात. बाळाचा आवाज ऐकताच आतापर्यंत सोसलेल्या सगळ्या वेदनांचा तिला क्षणात विसर पडतो. त्यानंतर तिच्या बाहूपाशात विसावलेला तो चिमुकला जीव तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा होऊन जातो. त्याच्या भोवतीच तिचे आयुष्य फिरणार असते. असे असताना अनेक कष्ट, असह्य प्रसूतीवेदना सोसून जन्म दिलेल्या पोटच्या गोळ्याचा असा अकाली मृत्यू झाल्यास त्या मातेच्या वेदनांचे मूल्यमापन करता येईल काय? पूजा आशिष घरडे, शिल्पा दिनेश विरूळकर, माधुरी बंटी कावरे, आफरीन बानो अब्दुल राजीक या चारही नवप्रसूतांना मात्र घरी जाण्यापूर्वीच आपल्या इवल्याशा बाळांचा कायमस्वरूपी विरह सोसावा लागलाय. शिल्पा व माधुरी यांची प्रसूती पीडीएमसीतच झाली. शिल्पाला पाच दिवसांचा, तर माधुरीला चार दिवसांचा गोंडस मुलगा. पूजा व आफरीनची प्रसूती मात्र खासगी इस्पितळात झालेली. पूजाला ३ दिवसांची मुलगी, तर आफरीनला १ दिवसाचा गोंडस मुलगा. या चौघींच्या बाळांवर पीडीएमसीच्या नवजात शिशू-बालक अतीदक्षता विभाग (एनआयसीयू) मध्ये उपचार सुरू होते. विशेष म्हणजे चौघांनाही रविवारी सुटी देण्यात येणार होती. रविवार सुटीचा दिवस असल्याने त्यांना सोमवारी सुटी दिली जाईल, असे सांगण्यात आले. घरी जाण्याच्या आनंदात त्या मातांनी त्यांचे सामान बांधून ठेवले. नियमाप्रमाणे झोपी जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या बाळांना ‘फिडिंंग’ही केले. मात्र, अकस्मात मध्यरात्री आफरीन बानोच्या चार दिवसांचे बाळ दगावल्याची धक्कादायक माहिती मिळाली. त्यापाठोपाठ दर अर्ध्या तासाने इतर चार मुले सुद्धा दगावली. मात्र, आफरीनचे बाळ ‘सेफ्टीसिमिया’ या आजाराने दगावल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. मात्र, इतर बालकांच्या मृत्युचे कारण कळू शकले नाही. रविवारी सुटी झाली असती तर..रविवारी या चारही शिशुंना सुटी होणार होती. मात्र, अवकाश असल्याने सुटीची प्रक्रिया सोमवारी पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले आणि नेमकी रविवारची रात्रच त्यांच्यासाठी काळरात्र ठरली. रविवारीच सुटी मिळाली असती तर कदाचित हा भयंकर प्रसंग टळला असता, असा सूरही दु:खद विलापातून नातलग व्यक्त करीत होते. रवि राणा आक्रमक माहिती मिळताच आ. रवी राणा पीडीएमसीत पोहोचले. त्यांनी अधिष्ठाता दिलीप जाणे यांना जाब विचारला. डॉ.भूषण कट्टा यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची सूचना केली. पीएम अहवाल व चौकशीअंती कारवाई होईल, अशी भूमिका ठाणेदार कैलास पुंडकर यांनी मांडली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कारवाई न झाल्यास ठाण्यात ठिय्या देण्याचा इशारा आ. राणा यांनी दिला. विजेचा शॉक लागल्याचा नातलगांना संशयइनक्युबेटरमध्ये शिशुंना विद्युत शॉक लागल्याने त्यांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्याचा संशय मृतांच्या पालकांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात अधिष्ठात्यांनी इनक्युबेटरची पाहणी केली असता त्यात कुठलाही बिघाड आढळला नाही. मातांचे आक्रंदन रात्री सुखरूप असलेली आपली बाळे दगावल्याची माहिती मिळताच मातांच्या आक्रोेशाला पारावार उरला नाही. त्यांचे आक्रंदन पाहून उपस्थितांचे डोळे सुद्धा पाणावले. आमची मुले परत द्या. असा टाहो त्यांनी फोडला. या मातांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. नुकतीच जगात आलेली आपली मुले आता पुन्हा दिसणार नाहीत, हे सत्य पचविणे त्यांच्यासाठी अवघड आहे. मंत्रालय स्तरावरून हालचाली ही गंभीर घटना कर्णोपकर्णी होताच वरिष्ठ स्तरावरून हालचाली सुरू झाल्या. पीडीएमसीकडे दूरध्वनीवरून विचारणा करण्यात आली. मुंबईस्थित डायरेक्टर आॅफ मेडिकल रिसर्च सेंटरच्या अधिकाऱ्यांसह आरोग्य उपसंचालकांनी माहिती घेऊन योग्य ती पारदर्शक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. डॉक्टरांची नातलगांना उद्धट वागणूकरूग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांद्वारे रूग्णांच्या नातलगांना उद्धट वागणूक दिली जाते, असा आरोपही यावेळी करण्यात आला. बालकांसाठी दूध आहे का, असा प्रश्न विचारला असता, आम्ही काय म्हशी बांधल्या आहेत का, असा प्रतिप्रश्न परिचारिकेने केल्याचे नातलगांचे म्हणणे आहे. डॉ. कट्टा यांच्या कानशिलात लगावलीनिवासी वैद्यकीय अधिकारी भूषण कट्टा यांच्याकडे जन्मजात शिशु बालक अतिदक्षता कक्षाची जबाबदारी होती. सोमवारी मध्यरात्री डॉ. कट्टा यांनी मद्यप्राशन केले होते. त्यांनी औषधोपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.मनसेचे संतोष बंद्रे, बच्चू रेळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता जाणे यांच्या कक्षात शिरून त्यांना जाब विचारत पारदर्शक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. मृतांचे काही नातेवाईक देखील जाणे यांच्या कक्षात पोहोचले. त्यानंतर डॉ. भूषण कट्टा यांना डीनच्या कक्षात बोलाविण्यात आले. संतप्त मनसैनिकांसह नातलगांनी भूषण कट्टा यांच्या कानशिलात लगावल्याने याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. शवविच्छेदनगृहापर्यंत फरफटत आणली ‘सीएस’ यांची खुर्ची तब्बल तेरा तास प्रतीक्षा करूनही शिशुंच्या मृतदेहाचे विच्छेदन होत नसल्याने हतबल झालेल्या पालकांचा संयम सायंकाळी ७ वाजता अखेर ढळला. त्यांच्या शोकाचे रूपांतर आक्रमक संतापात झाले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची खुर्ची ओढत कक्षाबाहेर आणली आणि फरफटत शवविच्छेदन गृहासमोर नेऊन तोडफोड केली. संतप्त नातलगांनी हा मार्ग अडवून चक्काजाम करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र, तेथे तैनात पोलिसांनी नातलगांना रस्त्याच्या कडेला नेऊन त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केलेत.