शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प ठरणार विदर्भासाठी उपलब्धी, हैदराबादच्या राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 16:11 IST

अमरावती- पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भात अतितुटीच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला प्रकल्प विदर्भासाठी संजीवनी ठरणार आहे.

गजानन मोहोडअमरावती- पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भात अतितुटीच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला प्रकल्प विदर्भासाठी संजीवनी ठरणार आहे. ना. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीतील मंत्रालयांतर्गत ४४० किमी लांबीचा हा प्रकल्प विदर्भातील सहा जिल्ह्यांत मार्गक्रमित होऊन बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात सोडण्याचे प्रस्तावित आहे.२५ राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार १९१२ दलघमी पाणी विचारात घेऊन वैनगंगा ते नळगंगा नदी जोड कालव्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण (एनडब्लूडीए)द्वारा तयार करण्यात येत आहे. एकूण ४४० किमी लांबीचा हा जोड कालवा गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या तिरावरून सुरू होऊन त्याची संरेखा भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व अकोला या जिल्ह्यांतून मार्गक्रमित होऊन शेवटी बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पस्थळी सोडण्याचे नियोजन आहे. यापूर्वीच झालेल्या एनडब्लूडीएचे मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत विदर्भातील जलसंपदा विभागाच्या बैठकीत या जोड कालवा प्रकल्पाला अंशत: मान्यता देण्यात आली आहे.गोसीखुर्द ते काटेपूर्णा प्रकल्पापर्यंतच्या ३०८ किमीच्या जोड कालव्याचे सर्वेक्षण एनडब्लुडीएद्वारा पूर्ण झालेले आहे. या जोड कालव्याची अमरावती जिल्ह्यात लांबी ९० किमीची आहे. यामध्ये निम्न वर्धा प्रकल्पाजवळ ५० किमीची लिफ्ट प्रस्तावित आहे, तर २३८ ते ४४० किमी दरम्यानची लांबी अकोला व बुलडाणा जिल्ह्यात आहे. यामध्ये काटेपूर्णा प्रकल्पाजवळ २७ मीटर उंचीची लिफ्ट राहणार आहे. या प्रकल्पात अमरावतीच्या जिल्ह्यात ९० किमी लांबीच्या दरम्यान आठ साठवण तलाव प्रस्तावित आहेत. या साठवण तलावामध्ये ४६२. ७८ दलघमी साठ्याच्या माध्यमातून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील २०२ किमी लांबीच्या अंतरात सहा साठवण तलावांतील ३९६.३७ दलघमी साठ्याच्या माध्यमातून ३४ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.३०८ किमी लांबीचे संरेखा सर्वेक्षण पूर्णराष्ट्रीय जलविकास प्राधिकरण, हैदराबादद्वारा साखळी क्रमांक ३०८ किमी पर्यंतच्या जोड कालव्याच्या साखळी क्र. ३०८ पर्यंतचे संरेखा सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४४० किमीपर्यंत म्हणजेच नळगंगापर्यंतच्या संरेखाला ७ जानेवारीला झालेल्या मुख्य अभियंत्याच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. जोड कालव्याच्या बाजूला असलेल्या कालव्यातून उपलब्ध होणा-या पाण्यामधून रबीच्या सिंचनासाठी पाणीसाठा निर्माण करण्यासाठी मंडळांतर्गत सर्वेक्षण अन्वेषण विभागास मानचित्र तयार करून स्थळे निश्चितीसाठी सांगण्यात आले आहे.केंद्राच्या अखत्यारीतील हा नदीजोड प्रकल्प पश्चिम विदर्भासाठी नवसंजीवनी देणारा असल्याची चर्चा रविवारी ना.नितीन गडकरी यांच्याशी झाली. प्रकल्पाची किंमतवाढ झाल्याने यावर तोडगा काढला जाईल, गडकरी यांनी सांगितले.- निवेदिता चौधरी,प्रदेश सचिव, भाजपा

टॅग्स :Amravatiअमरावती