शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात उभारली मतदानाची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 13:38 IST

बांबूवर पांढऱ्या कापडासह मातीचे मडके उलटे लटकवून अमरावती लोकसभा मतदारसंघातील शाळा- शाळांमधून ही मतदानाची गुढी उभारली जात आहे. 

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बांबूवर पांढऱ्या कापडासह मातीचे मडके उलटे लटकवून अमरावती लोकसभा मतदारसंघातील शाळा- शाळांमधून ही मतदानाची गुढी उभारली जात आहे. गुढीपाडवा ६ एप्रिलला आहे. पण, ही मतदानाची गुढी शुक्रवार, ५ वा सोमवार ८ एप्रिलला शाळेत उभारून प्रति गुढीपाडवा उत्सव साजरा करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. ‘चुनावी पाठशाला’ उपक्रमांतर्गत ही गुढी मुख्याध्यापकांना उभारायची आहे.गुढीकरिता आवश्यक मातीच्या मडक्यावर शाळेतील कलाशिक्षक किंवा चित्रकला अवगत असलेल्या शिक्षकाला ‘लोकसभा इलेक्शन-२०१९ देश का महात्यौहार’चा निर्धारित लोगो साकारायची आहे.मातीचे मडके शक्य नसल्यास पांढऱ्या कापडावर महात्यौहारचा लोगो काढून बांबूच्या सहाय्याने मडकेविरहीत पांढºया कापडाची गुढी उभारण्याची मुभा मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. ही गुढी शाळा संपण्याच्या वेळी मुख्याध्यापकांना खाली काढायची आहे. गुढी उभारताना निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, याची काळजीदेखील मुख्याध्यापकांना घ्यावयाची आहे.गुढी पाडव्यातील गुढीला तांब्याचे भांडे, नवीन रंगीत आकर्षक कापड, भरजरीची साडी किंवा शालू, आंबा व कडूनिंबाची डेहाळी आणि होळीच्या गाठीचा मान आहे. हे सर्व असल्यावरच ती गुढी पूर्णत्वास जाते. गुढी शब्द सार्थकी ठरतो. सूर्योदयाला उभारली जाणारी ही गुढी सूर्यास्तादरम्यान उतरविली जाते. याउलट बांबूच्या काठीवर पांढरे कापड अन् मातीचे मडके उलटे लटकवून उभे करण्याच्या उपक्रमात गुढी हा शब्द सार्थकी ठरत नाही. याला गुढी शब्द जोडणे योग्य नाही, तर गुढी हिंदू उभारतात. यामुळे यातील गुढी शब्दच आचारसंहितेचा भंग ठरवित असल्याचा प्रतिप्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, अनेक शाळांमध्ये चित्रकला शिक्षक नाहीत. चित्रकलेची जाण असली तरी हुबेहूब चित्र उतरविण्याची कला अवगत असलेले शिक्षक बोटावर मोजण्याइतपत आहेत. यात महात्यौहारचा लोगो कोण साकारणार, ही समस्या उभी ठाकली आहे.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा