शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

धामणगावात मतदारांनी दाखविले चातुर्य

By admin | Updated: October 19, 2014 23:14 IST

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा करिष्मा चालला, देशात सत्तांतर झाले. लोकसभेनंतर अवघ्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही मोदींच्या लाटेचा परिणाम संभवणार असा अंदाज

अमरावती : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा करिष्मा चालला, देशात सत्तांतर झाले. लोकसभेनंतर अवघ्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही मोदींच्या लाटेचा परिणाम संभवणार असा अंदाज बांधला जात होता. अमरावती जिल्ह्यापुरता विचार केल्यास येथेही मोदींची लहर भाव खाऊन गेली हे लक्षात येते. चार जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले. परंतु ज्या अरूण अडसड यांच्या प्रचारार्थ खुद्द मोदींनी चांदूररेल्वेत सभा घेतली, त्या अडसडांचा मात्र निसटता का होईना, पराभव झाला. भाजप श्रेष्ठींना जिव्हारी लागणारा हा पराभव म्हणावा लागेल. या पराभवाचे अनेक अन्वयार्थ काढले जात आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून अरूण अडसड ओळखले जातात. भाजपच्या सत्तेच्या काळात त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढताना भाजपने त्यांच्यावर विश्वास दर्शविला. त्यांना उमेदवारी दिली. अडसडांचा विजय पक्षासाठीही गरजेचा होता. त्यामुळे त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन चांदूररेल्वे येथे करण्यात आले. मोदींची ही सभा नेहमीप्रमाणेच यशस्वी ठरली. मोदींची लाट लक्षात घेता धामणगावातही सत्तांतर घडून येणार, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु ऐनवेळी परिस्थिती पालटली आणि अवघ्या ९७४ मतांनी अरूण अडसड यांचा पराभव झाला. मोदींची सभा झाल्याने वलयांकित ठरलेली अरूण अडसड यांची उमेदवारी अनेक अर्थांनी वैशिष्टयपूर्ण होती. परंतु काँग्रेसच्या वीरेंद्र जगतापांनी त्यांचा पराभव केला. यावरून चांदूररेल्वे मतदारसंघात ‘मोदी फॅक्टर’चा प्रभाव पडला नाही, असाही काढला जात आहे. तर दुसरीकडे जगताप यांनी केलेल्या विकासकामांनाच येथील जनतेने प्राधान्य दिले असा दुसरा एक सूरही उमटत आहे. स्थानिक मतदार सदसदविवेकबुध्दीने मतदान करून योग्य त्या व्यक्तिला निवडून आणू शकतोे, असाही सूर उमटत आहे.