आॅनलाईन लोकमतअमरावती : धामणगाव तालुक्यातील देवगाव येथील एका बारचालकाने गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून अधिकृत ले-आऊटमधील रस्ता बंद करून वाहतूक दुसऱ्याच मार्गाने वळविल्याची कैफीयत आमदार वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. येथे बीडीओ पंकज भोयर यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने आ. जगताप संतापले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्यासमोरच त्यांची कानउघडणी केली. जर अतिक्रमण नियमाने काढले नाही तर गाठ माझ्याशी आहे, असेदेखील ठणकावून सांगितले.हा प्रकार जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासमोरच घडल्यामुळे त्यांनी मध्यस्थी करीत नियमानुसार जर अतिक्रमण केले असेल तर ते काढले पाहिजे. त्यासाठी मी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यास तयार आहे. आपण योग्य ती कारवाई करावी, असे गटविकास अधिकारी पंकज भोयर यांना आ. जगताप यांनी आदेशित केले. येथील बार मालकाचे काही महिन्यांपूर्वी हायवेलगत असल्याने बार बंद पडले होते. त्यामुळे अधिकृत लेआऊटमधून रस्ता न दाखविता रस्ता फेºयातून दाखविल्यामुळे २२० मीटरपेक्षा अधिक लांबी भरत असल्याने बार सुरू झाल्याचेही यावेळी आ. जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यवतमाळ- धामणगाव हा राज्यमार्ग आहे. पण, हा रस्ता बारपासून जवळच असल्याने नागपूर - पुलगाव, वर्धा देवगाव तळेगाव राष्ट्रीय महामार्ग दर्जाच्या राज्यमहामार्गावरून वाहतूक वळविण्याचा घाट रचण्यात आल्याने येथील बारचे अंतर वाढवून ते सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटी, शर्ती नियमात बसविण्यात आले. यामध्ये अनेक अधिकाºयांचा हात असल्याचेही जगताप यांनी सांगितले. यामुळे चार जण याविरोधात उच्च न्यायालयातही गेले आहेत. बार चालकाच्या दबावात येथील वरिष्ठ अधिकारीही येत असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
वीरेंद्र जगतापांनी केली बीडीओंची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 21:56 IST
आॅनलाईन लोकमतअमरावती : धामणगाव तालुक्यातील देवगाव येथील एका बारचालकाने गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून अधिकृत ले-आऊटमधील रस्ता बंद करून वाहतूक दुसऱ्याच मार्गाने वळविल्याची कैफीयत आमदार वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. येथे बीडीओ पंकज भोयर यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने आ. जगताप संतापले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्यासमोरच त्यांची कानउघडणी केली. जर अतिक्रमण ...
वीरेंद्र जगतापांनी केली बीडीओंची कानउघाडणी
ठळक मुद्देअसमाधानकारक उत्तर : देवगाव रस्त्यावरील अतिक्रमणाचे प्रकरण