शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

विनोद तावडे म्हणाले, आवाज चढवून बोलू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:30 IST

राज्याचे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शुक्रवारी बोलावलेल्या ‘शैक्षणिक संस्थाचालकांशी संवाद सभे’त सिनेट सदस्य तथा प्राचार्य संतोष ठाकरे यांचे काही ऐकून न घेता, ‘आवाज चढवून बोलू नका, ऐकायचे नसेल तर बाहेर जा,’ अशी तंबी देत त्यांना खाली बसण्याचा सल्ला दिला.

ठळक मुद्देविद्यापीठात संवाद सभेत विसंवाद : शैक्षणिक संस्थाचालकांसोबत झडला वाद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याचे शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शुक्रवारी बोलावलेल्या ‘शैक्षणिक संस्थाचालकांशी संवाद सभे’त सिनेट सदस्य तथा प्राचार्य संतोष ठाकरे यांचे काही ऐकून न घेता, ‘आवाज चढवून बोलू नका, ऐकायचे नसेल तर बाहेर जा,’ अशी तंबी देत त्यांना खाली बसण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर शिक्षणमंत्र्यांच्या स्वीय सहायकाने प्राचार्य ठाकरे यांचा हात धरून खाली बसविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही वेळातच संवाद सभा गुंडाळण्याची नामुष्की शिक्षणमंत्र्यांवर आली.विद्यापीठाच्या स्व. के.जी. देशमुख सभागृहात आयोजित संवाद सभा पाऊणतास उशिराने सुरु झाली. कुलसचिव अजय देशमुख यांनी प्रास्ताविक, तर अध्यक्षीय भाषण कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले. त्यानंतर ना. तावडे यांनी संवादाला प्रारंभ केला. सुरुवातीला वसंतराव घुईखेडकर, हर्षवर्धन देशमुख, दीपक धोटे, श्रीकृष्ण अमरावतीकर, कांचनमाला गावंडे आणि त्यानंतर प्राचार्य संतोष ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी निगडीत मुद्दे शिक्षणमंत्र्यांच्या पुढ्यात ठेवले. डिजिटायझेशन झाले असताना विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही. महाविद्यालये कशी चालवावीत, विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या कोण, कशा सोडविणार, असा सवाल संतोष ठाकरे यांनी उपस्थित केला. मात्र, ना. तावडे यांनी ठाकरे यांनाच ‘आवाज चढवून बोलू नका, प्रश्न संपले असतील तर खाली बसा’ असे म्हटले. यादरम्यान शिक्षणमंत्र्यांच्या स्वीय सहायकाने ठाकरे यांचा हात धरून खाली बसवायचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे आणि स्वीय सहायक यांच्यात ‘तू-तू, मै-मै’ झाली. अखेर शिक्षणमंत्र्याच्या या अफलातून प्रकारावर संतोष ठाकरे संतापले ‘ऐकून घ्यायचे नसेल तर बोलावले कशाला? संवाद सभेची नौटंकी, फार्स बंद करा,’ असे म्हणत ठाकरे सभागृहातून बाहेर पडले. त्यानंतर सभेत स्मशानशांतता पसरली. काही वेळाने ती गुंडाळली. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, व्यवस्थापन परिषदेचे दिनेश सूर्यवंशी, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, तंत्रशिक्षण सहसंचालक डी.व्ही. जाधव, कुलसचिव अजय देशमुख, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर आदी सभेत उपस्थित होते.शिक्षणमंत्री प्रश्नांबाबत गंभीर नाहीतशिष्यवृत्तीचा प्रश्न संपूर्ण राज्यात गाजत आहे. काही मुद्दे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुढ्यात ठेवले. मात्र, ते काहीच ऐकण्याचा मन:स्थितीत नव्हते. कोणत्याही प्रश्नाचे गंभीरपणे उत्तर देत नव्हते. त्यामुळे संवाद सभा ही नौटंकी, फार्स ठरली, असे मूर्तिजापूर येथील प्राचार्य संतोष ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पैसे नसल्याची शिक्षणमंत्र्यांची कबुलीशैक्षणिक संस्थाचालकांचे प्रश्न, समस्या अनेक आहेत. मात्र, रिक्त जागा भरण्यासाठी तिजोरीत पैसे नसल्याची कबुली शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिल्याची माहिती कांचनमाला गावंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कर्मचारी भरतीशिवाय ‘नॅक’ दर्जा कसा मिळणार, असा प्रश्न गावंडे यांनी उपस्थित केला.वाद नव्हे, ती संवाद चर्चा होती. काही विषयांवंर मत वेगळे मांडले जाऊ शकतात. संतोष ठाकरे यांनी काही प्रश्न, समस्या मांडल्यात. त्यांचे समाधान झाले नसावे. याला वाद म्हणता येणार नाही.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.