शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विनोद शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:13 IST

परतवाडा (अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा जामीन ...

परतवाडा (अमरावती) : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज शुक्रवारी अचलपूर येथील पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. मुनगीनवार यांच्या न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्याला अजूनही पुढील आदेशापर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

विनोद शिवकुमार याला जामीन मिळावा, यासाठी वकिलांतर्फे अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर गुरुवारी दोन्ही पक्षांच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी जामीन अर्जावर निर्णय ठेवला होता. त्यानुसार विनोद शिवकुमार हा गुगामल वन्यजीव विभागात वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होता. पळून जाताना त्याला अटक करण्यात आली. इतर साक्षीदारांवर दबाव आणू शकतो आणि पळून जाण्याची शक्यताही न्यायालयाने वर्तविली. त्यावरून जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून रिव्हाॅल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकरणाला विनोद शिवकुमार हा जबाबदार असल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याने विनोद शिवकुमारविरुद्ध गुन्हा दाखल करून तो नागपूर रेल्वे स्टेशनहून पळून जात असताना त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, विनोद शिवकुमार एमसीआरपासून अमरावती जिल्हा कारागृहाच्या क्वाॅरंनटाईन सेंटरमध्ये आहे. कोरोनाकाळात १५ दिवसांपेक्षा अधिक काळ संपला आहे. आता तर त्याचा जामीनदेखील फेटाळण्यात आला. त्यामुळे त्याला आता थेट कारागृहात पाठविण्याची मागणी होऊ लागली आहे.

बॉक्स

चालकाचे बयाण ठरले महत्त्वपूर्ण

विनोद शिवकुमार याच्या चालकाचे बयाण न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरले आहे. गुगामलला उच्च पद भूषविल्यामुळे तो साक्षीदारांना सहज त्रास देऊ शकतो. याशिवाय चालकाच्या साक्षीच्या निवेदनातून हे उघड झाले आहे की, घटनेनंतर विनोद शिवकुमार सरकारी वाहनातून परतवाडा येथे आला. त्याने त्या चालकाला त्याचा मोबाईल बंद करण्यास सांगितले. त्यानंतर नागपूर विमानतळावर जाण्यासाठी खासगी वाहन भाड्याने घेतले. विमानतळावर जाण्याऐवजी तो नागपूर रेल्वे स्थानकात गेला. त्याने चालकाला रेल्वेचे तिकीट काढण्यास सांगितले. रेल्वे तिकीट मिळाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला रेल्वे स्टेशन नागपूर येथे अटक करण्यात आली. त्यामुळेच त्याचे आचरण स्पष्टपणे दाखवते की, तो न्यायालयापासून पळून जात होता. अशा परिस्थितीत, जामिनावर सोडल्यास तो पळून जाऊ शकतो. असा निर्वाळा न्यायाधीश एस. के. मुनगीनवार यांनी दिला आहे.