शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

विनोद शिवकुमार बाला, रेड्डींच्या पोस्टरचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

‘दीपाली चव्हाण अमर रहे’, ‘एम. एस. रेड्डी मुर्दाबाद’, ‘विनोद शिवकुमार मुर्दाबाद’ असे नारे लावत दोघांच्या फोटोंना महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी चपलेचा प्रसाद दिला. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सर्वत्र या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला फाशी देण्यासह त्याला बळ देणाऱ्या एम.एस. रेड्डींना निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी वनपाल वनकर्मचारी संघटनेच्यावतीने लावून धरण्यात आली आहे. 

ठळक मुद्देहरिसाल येथे होलिकोत्सव, ‘दीपाली अमर रहे’च्या घोषणा, वनरक्षक, वनपाल संघटनेतर्फे श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी/ चिखलदरा :  वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात वन कर्मचाऱ्यांनी हरिसाल येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता मेळघाटचे तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी आणि निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला यांचे पोस्टर लावून होळीचे दहन केले. ‘दीपाली चव्हाण अमर रहे’, ‘एम. एस. रेड्डी मुर्दाबाद’, ‘विनोद शिवकुमार मुर्दाबाद’ असे नारे लावत दोघांच्या फोटोंना महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी चपलेचा प्रसाद दिला. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सर्वत्र या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला फाशी देण्यासह त्याला बळ देणाऱ्या एम.एस. रेड्डींना निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी वनपाल वनकर्मचारी संघटनेच्यावतीने लावून धरण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवि राणा यांच्याकडे रविवारी  वनपाल व वनकर्मचाऱ्यांनी व्यथा मांडल्या. मोठ्या प्रमाणात वनविभागातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अनेक ‘दीपाली’ आहेत वनविभागातरविवारी हरिसाल येथे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करताना उपस्थित काही महिला कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडत अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली. गावकरी व अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. विनोद शिवकुमार बालाचे अनेक कारनामे यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

क्रूर प्रवृत्तीचे दहनआरोपी विनोद शिवकुमार बाला व अन्य अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून अजूनही कुणी महिला कर्मचारी व इतर कर्मचारी बळी पडू नये, त्या राबवून घेण्याच्या क्रूर प्रवृत्तीचे दहन करण्याचा निर्णय वनपाल वनरक्षक संघटनेने घेतला. या क्रूर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांचे पोस्टर होळीला गुंडाळून जाळण्यात आले.  वनपाल, वनकर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेचे विविध पदाधिकारी कर्मचारी, गावकरी उपस्थित होते.

‘लोकमत’ वृत्ताची चर्चादीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ‘लोकमत’मधील वृत्ताची सर्वत्र चर्चा होती. श्रीनिवास रेड्डी यांच्याबद्दल चांगले लिहून देण्यासाठी टाकण्यात आलेल्या  दबावाचे प्रकाशित वृत्त चांगलेच चर्चेत होते. 

एसीत बसून जंगलाचे संरक्षणश्रीनिवास रेड्डी यांच्या कार्यालयातील या महिला कर्मचारी असून त्यातील काहींना ११ महिन्यांची ऑर्डर आहे. चार ते पाच वर्षांपासून त्या तेथेच ठाण मांडून आहेत. काही महिला कर्मचारी मेळघाटात कार्यरत असून, त्यांची प्रतिनियुक्ती रेड्डींच्या कार्यालयात आहे. एसीत बसून जंगलाचे काम करणाऱ्या या महिलांबद्दल प्रचंड संताप संघटनांनी व्यक्त केला. मंगळवारी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना व इतर संघटनांच्यावतीने त्यांना जाब विचारला जाणार आहे.

कुठल्याच दबावातून वनकर्मचारी अधिकाऱ्यांनी हुजेरीगिरी करू नये, काही महिलांनी तसे लिहून दिले. त्यानंतर दबावातून हा प्रकार असल्याचे त्यांनी फोनवर सांगितले. यासंदर्भात मंगळवारी अमरावती येथे संघटनेच्यावतीने निषेध नोंदवण्यात येणार आहे.- प्रदीप बाळापुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना  अमरावती

 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforest departmentवनविभाग