शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

७२११ गावे बाधित, पैसेवारी ४६; खरीप हंगामाच्या अंतिम पैसेवारीत पिकांची स्थिती स्पष्ट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 17:25 IST

यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी गुरुवारी जाहीर केली.

गजानन मोहोडअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी गुरुवारी जाहीर केली. यानुसार पाचही जिल्ह्यांत सरासरी ४६ पैसेवारी आहे. या सर्व जिल्ह्यांतील ७२११ दुष्काळबाधित गावांना आठ प्रकारच्या सवलती निकषाने लागू होतील. यापूर्वी महसूल विभागाद्वारे नजरअंदाज  व सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आलेली होती. यामध्ये पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त होती. त्यामुळे विभागातील शेतक-यांचे खरिपाच्या अंतिम पैसेवारीकडे लक्ष लागले होते. विभागातील पाचही जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यात पैसेवारी जाहीर केली व अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला. त्यानुसार आयुक्तांनी विभागाची पैसेवारी ४६ असल्याचे जाहीर केले आहे.केंद्र शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१७ नुसार दुष्काळाची परिभाषा निश्चित केली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या निर्देशांकानुसार आता दुष्काळ जाहीर केला जातो. त्यामुळे पैसेवारीच्या प्रचलीत पद्धतीने दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत आता बंद झाली आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत आता दुष्काळ जाहीर होणार नसला तरी खरीप हंगामाचे वास्तववादी चित्र या पैसेवारीने स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शासनाने या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.

ऑक्टोबरच्या अवकाळीत २२ लाख हेक्टर बाधित पश्चिम विदर्भात १७ ते २८ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अवकाळी  पावसाने २० लाख २५ हजार १९७ शेतक-यांच्या २२ लाख ४४ हजार ३९८ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३ लाख ७३ हजार ३५० हेक्टर, अकोला ३ लाख ६९ हजार ७१९, यवतमाळ जिल्ह्यात ५ लाख २३ हजार ४७५, बुलडाणा जिल्ह्यात ६ लाख ९० हजार ४८८  व वाशिम जिल्ह्यात २ लाख ८७ हजार १६४ हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जिल्हानिहाय जाहीर पैसेवारी जिल्हा        बाधित गावे        पैसेवारीअमरावती    १९६१        ४६अकोला    ९९०        ४५यवतमाळ    २०४८        ४७वाशिम        ७९३        ४७बुलडाणा    १४१९        ४३एकूण        ७२११        ४६