शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

'या' गावात सरणावरील मृतदेहावर धरावी लागते ताडपत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:24 IST

अमरावती जिल्ह्यातील कांडगी गावात सरणावरील मृतदेह पावसाने ओला होऊ नये म्हणून नातेवाइकांना त्यावर चक्क ताडपत्री धरावी लागत आहे.

ठळक मुद्देकांडलीत स्मशानभूमीची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुळ्या शहरांचा विस्तार ज्या भागात होत आहे, त्या कांडली ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीची दुरवस्था पावसाळ्यात उघड झाली आहे. कांडगी गावात सरणावरील मृतदेह पावसाने ओला होऊ नये म्हणून नातेवाइकांना त्यावर चक्क ताडपत्री धरावी लागत आहे.कांडली स्मशानभूमीतील दुरवस्था लक्षवेधक ठरत आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कारांसाठी बांधलेल्या सिमेंट ओट्यावरील टीन गायब आहेत. एक-दोन टीन त्यावर दिसत असले तरी पावसाच्या पाण्यापासून ते टीन मृतदेहाचा, चितेचा बचाव करू शकत नाहीत. प्रेत जळत असताना मध्येच आलेल्या पावसाने ते सरण विझण्याच्या, ओलेचिंब होत राख इतरत्र पसरण्याच्या प्रसंगालाही सामोरे जावे लागत आहे.

तीन दिवसांपूर्वी सरणावरील मृतदेह ओला होऊ नये याकरिता त्यावर ताडपत्री धरण्याचा प्रसंग आप्तांवर गुदरला. या घटनेने संतप्त होऊन प्रथमेश ठाकरे, प्रीतेश अवघड, जयराज घोरे, अमन भंडारी, तुषार तोंडगावकरसह आदींनी कांडलीच्या ग्रामसचिवांना निवेदन दिले. यात टिनशेडच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.जनसुविधा अंतर्गत स्मशानभूमीतील आवश्यक कामे करण्याकरिता प्रस्ताव पाठविण्यात येतील. किरकोळ दुरुस्ती असल्यास ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून ते काम करू. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवू.- एम.एस. कासदेकरप्रशासक, कांडली ग्रामपंचायत२०१४ मध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून हे टीनशेड टाकले गेले. तत्त्कालीन आमदार केवलराम काळे यांच्या निधीतून स्मशानभूमीला आवारभिंत आणि सभागृह बांधण्यात आले. मात्र, २०१४ नंतर कुणीही लक्ष दिले नाही.-ओमश्री घोरेमाजी सभापती, पंचायत समिती

टॅग्स :SocialसामाजिकGovernmentसरकार