शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाढोण्यात गावगाड्याचे राजकारण; ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थांबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 12:27 IST

Amravati : सरपंचपदाच्या भांडणात बँक खातेबदल करण्याचा ठराव नामंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क वाढोणा रामनाथ : स्थानिक ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. कारण गावगाड्याच्या राजकारणात सरपंचाच्या नावे बँक खातेबदल करण्याचा ठराव नामंजूर झाला. दोन महिन्यांपूर्वीच पदावर विराजमान झालेल्या सरपंचाच्या गोटात पाच, तर विरोधात सहा सदस्य आहेत.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोण्याच्या सरपंचपदी दोन महिन्यांपूर्वी सविता तिरमारे यांची निवड झाली. तेव्हापासून बैंक खातेबदल रखडला. त्यामुळे गावातील संपूर्ण विकासकामे थांबली आहेत. ग्रामपंचायतमध्ये एकूण अकरा सदस्य आहे. 

त्यापैकी पाच सदस्य सरपंच तिरमारे यांच्याकडे, तर सहा सदस्य विरोधात आहेत. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये बँक खातेबदल करण्यासाठी ठराव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी वाघोडे यांनी तसा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविला. पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला. परंतु, आजपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. 

त्यातच कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा झाले नाही. सरपंचांना पैसे खर्च करण्याचे अधिकार नाहीत. वाढोण्यात गेल्या तीन वर्षांपासून सरपंचपदासाठी न्यायालयीन वाद झडत आहेत. तो अजूनही थांबला नाही. जिल्हा परिषद यावर कुठली कायदेशीर कारवाई करणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

"ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव आला आहे. तो जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. लवकरच कारवाई होईल."- संजय झंजाड गटविकास अधिकारी, नांदगाव खंडेश्वर

टॅग्स :Amravatiअमरावतीgram panchayatग्राम पंचायत