शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचे टक्कल करून व्हिडीओ केला व्हायरल    

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 19:08 IST

एका १९ वर्षीय तरुणीचे टक्कल करुन व्हिडीओ काढून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार नांदगावपेठ हद्दीतील धोतरा गावालगतच्या जंगलात घडला.

अमरावती - एका १९ वर्षीय तरुणीचे टक्कल करुन व्हिडीओ काढून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार नांदगावपेठ हद्दीतील धोतरा गावालगतच्या जंगलात घडला. या गंभीर कृत्याची तक्रार पीडितेने पोलीस आयुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी नांदगावपेठ पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.तक्रारीनुसार, आई-वडील नसलेली ही १९ वर्षीय तरुणी तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बु. येथे दोन लहान भावांसोबत राहते. तिच्याच नातेवाइकांपैकी अनिल भोसले, करणसिंग पवार, राहुल भोसले व राजा वाघाडे असे चौघे मंगळवारी तिच्या घरी आले. त्यांनी तरुणीला जबरीने उचलून दुचाकीवर बसविले आणि धोतरा गावालगतच्या जंगलात नेले. तेथे हातपाय बांधून ब्लेडच्या साहाय्याने केस काढून तिचे टक्कल केले. त्या चौघांपैकी एकाने मोबाईलवर चित्रीकरण केले. तो व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याचे पीडितेने म्हटले आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास किंवा पोलीस तक्रार केल्यास जिवे मारून टाकण्याची धमकीही दिली. त्यामुळे तिने या घटनेची वाच्यता कोणाजवळ केली नाही तसेच पोलीस तक्रारही केली नाही. भीम आर्मीचा पुढाकारभीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांना हा गंभीर प्रकार माहिती होताच त्यांनी पीडित मुलीला धीर देत तिच्या मनातील भीती काढली. बुधवारी दुपारी भीम आर्मीचे महासचिव मनीष साठे, शहरप्रमुख बंटी रामटेके, अ‍ॅड. सुधीर तायडे, संजय भवते, साची फाऊंडेशनचे अध्यक्ष जगदीश गोवर्धन, विजय शेळके, विजय बादशे यांनी तिला घेऊन डीसीपींकडे तक्रार केली. केस कापण्याचे कारण गुलदस्त्यातमुलीचे केस का कापण्यात आले, याचे कारण गुलदस्त्यातच आहे. ती मुलगी ज्या समाजाची आहे, त्याच समाजातील नागरिकांनीच त्या मुलीचे केस कापले. ती मुलगी लहान भावांसोबत घरी एकटीच राहत होती. तिच्या चारित्र्यावर संशय घेणाºयांनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घडलेला प्रकार गंभीर असून, हे कृत्य करणाºयांना सोडले जाणार नाही. पीडितेच्या तक्रारीनुसार चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नांदगाव पेठ पोलिसांना दिले आहे.चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त.

टॅग्स :WomenमहिलाCrimeगुन्हाAmravatiअमरावती