प्रतिसाद : अंबानगरी फोटो-व्हिडिओ ग्राफर्स, अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असो.चा उपक्रमअमरावती : विदर्भात खूप कला दडलेली आहे. या कलेला वाव मिळण्याच्या दृष्टीने अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनद्वारे आयोजित विदर्भस्तरीय गणेशोत्सव छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी मैलाचा दगड ठरावी, असे प्रतिपादन आ. अनिल बोंडे यांनी केले. प्रदर्शनीचे उदघाटन पाहुण्यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे बटन क्लिक करून करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय बंड, सुनील भालेराव, लप्पी जाजोदिया आदी उपस्थित होते. मंचावर अंबानगरीतील फोटो-व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय देवाणी, सचिव नीलेश चौधरी, प्रकल्प प्रमुख राजेश वाडेकर उपस्थित होते. प्रास्ताविक मनीष जगताप, संचालन अनिल पडिया यांनी केले. संजय बंड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून दोन्ही संस्थांचे कौतुक केले. या विदर्भस्तरीय छायाचित्र प्रदर्शनीस गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मंगळवारी भेट दिली. व्यावसायिक, स्वछंदी छायाचित्रकारांनी गणेशोत्सव काळात काढलेल्या मिरवणुकीची छायाचित्रे काढली असून असोसिएशनच्यावतीने पारितोषिकांसाठी निवड केलेल्या सर्व छायाचित्रांची ना. पाटील यांनी पाहणी केली.या प्रदर्शनीसाठी अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर्श असोसिएशनचे अध्यक्ष विजय देवाणी, सचिव नीलेश चौधरी, प्रकल्प प्रमुख राजेश वाडेकर, अनिल सातपुते, अनिल पडिया, जयंत दलाल व दीपक मांगरूळकर यांच्यासह अमरावती प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे प्रकल्प प्रमुख मनीष जगताप यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. या प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विदर्भस्तरीय छायाचित्र स्पर्धा, प्रदर्शनी
By admin | Updated: October 8, 2015 00:07 IST