शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वीजप्रवाही कुंपणात अडकला विदर्भातील वाघांचा जीव! वर्षभरात सहा वाघ ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:50 IST

शिकारीच्या संकटानंतर आता शेती संरक्षणासाठी लावल्या जाणा-या वीजप्रवाही कुंपणांमध्ये जीव गमवण्याचा प्रसंग विदर्भातील वाघांवर ओढवत आहे. अशा रीतीने वर्षभरात सहा वाघांचे नाहक बळी गेला.

- गणेश वासनिक

अमरावती : शिकारीच्या संकटानंतर आता शेती संरक्षणासाठी लावल्या जाणा-या वीजप्रवाही कुंपणांमध्ये जीव गमवण्याचा प्रसंग विदर्भातील वाघांवर ओढवत आहे. अशा रीतीने वर्षभरात सहा वाघांचे नाहक बळी गेला. दुसरीकडे नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकºयांनी पिकांचे संरक्षण करावे की नको, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या विदर्भातील १० जिल्ह्यांमध्ये वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष वाढीस लागला आहे. व्याघ्र प्रकल्प आणि प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारीत ६० हजार चौरस कि.मी. जंगल आहे. दहापैकी सहा जिल्ह्यांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे व्याघ्र प्रकल्पदप्तरी नोंद आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट वगळता अकोला, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये बिबट मोठ्या संख्येने आहेत. गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वाघांचे वास्तव्य आहे. बहुतांश ठिकाणी जंगल आणि गावे संलग्न असल्याने पीकसंरक्षणासाठी वनक्षेत्रालगतच्या शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडला जातो. यामध्ये आकस्मिक प्रवेश करणारे वाघ, बिबट ठार झाले आहेत. वर्षभरात अशाप्रकारे सहा वाघ व १२ बिबट ठार झाल्याची नोंद आहे. वीजप्रवाही कुंपणाचा अंदाज न आल्याने माणसांचाही बळी गेला आहे. मात्र, पर्याय नसल्याने बळीराजाला हा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे वास्तव आहे.

सहा वाघ ठारकुंपणाला वीजप्रवाह सोडल्याने विदर्भात वर्षभरात सहा वाघांचे बळी गेल्याची नोंद वनविभागात आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा, चामोर्शीनजीक मारोडा, जामगिरी, तर चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर, भद्रावती, ताडोबा बफर झोन, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या ठिकाणांचा समावेश आहे.

पीक नुकसानभरपाईस विलंबवन्यप्राण्यांनी शेतातील उभे पीक उद्ध्वस्त केल्यास वनविभागाकडून सर्वेक्षण, घटनास्थळ पंचनामा, बयाण असा प्रवास पूर्ण केल्यानंतरही शेतक-यांना नुकसानभरपाईची रक्कम विलंबाने मिळत असल्याची ओरड आहे. पीक नुकसानभरपाई रकमेत २५ टक्के वाढ केली असली तरी प्रशासकीय दिरंगाईचा फटका शेतक-यांना सहन करावा लागतो.

वनांशेजारच्या शेताला सौरऊर्जेचे कुंपण आवश्यकविदर्भात ७० टक्के शेती ही जंगलाशेजारी आहे. त्यामुळे पिकांना वन्यप्राण्यांपासून सतत धोका आहे. शेतक-यांचे ते उदरनिर्वाहाचे साधन असल्याने संरक्षण त्यांची गरज आहे. शासनाने जंगलाशेजारील शेताला सौरऊर्जेचे कुंपण लावण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी समस्त शेतक-यांची आहे.

टॅग्स :Tigerवाघ