शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात साईबाबा पादुका दर्शन सोहळा, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 16:44 IST

विदर्भात श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन २५ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आल्याची माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली.

अमरावती : विदर्भात श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन २५ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आल्याची माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली. यानिमित्त विदर्भात तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.        पत्रपरिषदेला अमरावतीचे अशोक असोरीया, नागपूरचे पंकज महाजन, मोहन चव्हाण, आशिष चिरकुटे, पुलगावाचे अशोक चांडक, महेश राठी व धनराज वर्मा उपस्थित होते. नागपूर येथील श्री सदगुरू साई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने साई समाधी शताब्दी महोत्सव समितीची विदर्भात स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार समितीने २५ ते २७ जानेवारीदरम्यान नागपूर येथील महाल परिसरातील चिटणविस पार्कमध्ये पादुका दर्शन सोहळा होईल. दरम्यान तीन दिवसीय कार्यक्रमात १०८ कुंडी महायज्ञ, सामूहिक साई पारायण, भजन संध्या, कीर्तन आणि महानाट्य सादरीकरणासह रक्तदान शिबिर, कर्करोग तपासणी शिबिर, नेत्रतपासणी, अवयवदान संकल्प व ११ हजार निमवृक्ष वितरण करण्यात येणार आहेत. मुख्य आकर्षणात श्री साई समाधी मंदिर व द्वारकामाई प्रतिकृती साकारली जाणार असून विश्व विख्यात चित्रकार सुनील शेगावकरद्वारा चित्रित साई जीवनचरित्रावर आधारित चित्रप्रदर्शनी राहणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार व शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. 

अशी राहील महोत्सवाची रुपरेषा..,२५ जानेवारी- भंडारा येथील दसरा मैदान२९ जानेवारी- गोंदियातील कशिश लॉन३० जानेवारी - गडचिरोली३१ जानेवारी पुलगावातील साईधाम ग्राऊंड१ फेब्रुवारी - चंद्रपुरातील राजीव गांधी सभागृह२ फेब्रुवारी - यवतमाळातील शिंदे नगर प्रांगण३ फेब्रुवारी - वर्धा येथील न्यु इंग्लिश स्कूल प्रांगण४ फेब्रुवारी - अमरावतीतील साईनगरातील साई मंदिर५ फे ब्रुवारी - अकोला येथील साईमंदिर६ फेब्रुवारी - खामगावातील अकोला रोडवरील साई मंदिरात महोत्सव पार पडणार आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावती