शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात येत्या चार दिवसात पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:12 IST

कोरोना विषाणूचे संकट गडद होत असताना, वातावरणातही बदल होत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अंबानगरीत विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. पुढील १५ एप्रिलपर्यंत विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देहवामानतज्ज्ञांचा अंदाजअंबानगरीत विजांच्या कडकडाटासह बरसणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचे संकट गडद होत असताना, वातावरणातही बदल होत आहे. ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा अंबानगरीत विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. पुढील १५ एप्रिलपर्यंत विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली.अमरावती, यवतमाळ , चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात १२ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी पाऊस कोसळेल. १३ एप्रिलला पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा तसेच पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली येथे पावसाची शक्यता आहे. १४ एप्रिल रोजी बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल. १५ एप्रिल रोजी पूर्व विदर्भात व यवतमाळ येथे तुरळक पावसाची शक्यता आहे. दरम्यान कमाल तापमान ४० अंश सेलसिअसच्या आसपास राहणार आहे. ढगाळ वातावरण वरच्या वर येत असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बंसमुळे १८ एप्रिलपर्यंत कमी-जास्त प्रमाणात कायम राहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे.मध्य पाकिस्तान आणि राजस्थानवर चक्राकार वारेमध्य पाकिस्तान आणि राज्यस्थानवर ९०० मीटरच्या उंचीवर चक्राकार वारे आहेत. कर्नाटक किनारपट्टी , मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ या पट्ट्यामध्ये कमी दाबाची द्रोणिका किंवा खंडित वाऱ्याची स्थिती आहे. त्याच्या परिणामी विदर्भात पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस