शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विकास मंडळाची निधीला ‘ना’!

By admin | Updated: August 2, 2016 23:54 IST

सन २०१५-२०१६ या वित्तीय वर्षापासून विदर्भ विकास मंडळाला राज्य शासनाकडून विशेष निधी प्राप्त झालेला नाही.

२८ कोटींबाबत असमर्थता : महापालिका आयुक्तांना पत्रअमरावती : सन २०१५-२०१६ या वित्तीय वर्षापासून विदर्भ विकास मंडळाला राज्य शासनाकडून विशेष निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आपण प्रस्तावित केलेल्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही, अशा शब्दांत विदर्भ विकास मंडळाने निधीबाबत नकार कळविला आहे.अमरावती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी शहरातील १० प्रकल्पांसाठी २८०९ लाख रूपयांच्या निधीची मागणी विदर्भ विकास मंडळाकडे केली होती. ५ जुलैला आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव विदर्भ विकास मंडळाच्या सदस्य सचिवांच्या नावे पाठविला होता. यात महिला स्वच्छतागृहांसाठी २९७ लाख रुपये, स्मशानभूमी सुधारणेसाठी २९८ लाख रुपये, पब्लिक वर्क्स इम्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमसाठी १५० लाख रुपये, ई-वेस्टसाठी २९९ लाख रुपये, महिला उद्योजकता केंद्रासाठी ३०० लाख रुपये, प्लास्टिक वेस्ट विल्हेवाट प्रकल्पासाठी २९७ लाख रुपये, हॉटेल वेस्ट विल्हेवाट प्रकल्पासाठी २९८ लाख रुपये, शहरातील पाणीपुरवठ्यासाठी ३०० लाख रुपये, छोट्या जनावरांसाठी कत्तलखाना उभारण्याकरिता ३०० लाख रुपये आणि अत्याधुुनिक मटण मार्केटसाठी २७० लाख रुपये अशा एकूण २८०९ लाख रूपयांची मागणी करणारा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी ५ जुलैला पाठविला. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता, या प्रस्तावाकरिता विदर्भ विकास मंडळाने अनुदान स्वरूपात निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती मंडळाच्या सदस्य सचिवांकडे करण्यात आली. तथापि, अमरावती महापालिकेने प्रस्तावित केलेल्या या सर्व प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही, अशा शब्दांत विदर्भ विकास मंडळाच्या अपर आयुक्त तथा सदस्य सचिव निरुपमा डांगे यांनी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांना कळविले आहे. विदर्भ विकास मंडळाने अशाप्रकारे निधी उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे हे प्रकल्प तुर्तास प्रलंबित राहतील. (प्रतिनिधी)यापूर्वीही पाठपुरावा मनपा क्षेत्रातील दहा प्रकल्पांसाठी २८ कोटी रूपयांच्या निधीसाठी यापूर्वीही जोरकस प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांना यश मिळू शकले नाही. आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पवारांनीही विदर्भ विकास मंडळाकडे पाठपुरावा केला.