शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारातील बोगस कामाने घेतला बालकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:13 IST

गावालगतच्या नाल्यात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा जलयुक्त शिवार योजनेतील बोगस कामाने बळी गेल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथे रविवारी रात्री घडली. तळेगाव दशासर पोलीस उशिरा घटनास्थळी पोहोचल्यामुळे मृतदेह रात्री ११ पर्यंत पाण्यातच होता. 

ठळक मुद्देसातेफळ येथील घटना : नाल्यात बुडून मृत्यू, तळेगाव पोलीस लेटलतीफ

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : गावालगतच्या नाल्यात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय बालकाचा जलयुक्त शिवार योजनेतील बोगस कामाने बळी गेल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ येथे रविवारी रात्री घडली. तळेगाव दशासर पोलीस उशिरा घटनास्थळी पोहोचल्यामुळे मृतदेह रात्री ११ पर्यंत पाण्यातच होता. पार्थ अशोक धानोरकर (१३, रा. सातेफळ) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. सातेफळ गावाजवळील नाल्यात तो पोहायला गेला होता. मात्र, सिमेंट प्लगच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात खुले ठेवलेल्या लोखंडी बारचा त्याला मार लागला आणि खड्ड्यातच बुडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सायंकाळी अशोक धानोरकर यांना स्मारकाजवळील बंधाऱ्याच्या काठावर पार्थचे कपडे आढळून आले. तेथेच शोध घेतला असता तेव्हा त्याचा मृतदेह रात्री ८ वाजता नाल्यातील खड्ड्यात मिळाला. शेतकरी कुटुंबातील पार्थच्या पश्चात आई-वडील व १० वर्षाचा भाऊ आहे. सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. बंधाºयाचे कंत्राटदार कुटे (यवतमाळ) व अभियंता कडू यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.पोलिसांचा बेजबाबदारपणाग्रामस्थांनी रविवारी रात्री सव्वाआठला माहिती दिल्यानंतरही तळेगाव दशासर पोलीस १०.३० नंतरही घटनास्थळी पोहोचले नव्हते. आपचे नितीन गवळी यांनी एसडीपीओंशी संपर्क केल्यावर रात्री ११ वाजता पोलीस दाखल झाले.फाळेगाव फाटा येथे अपघातात एकाचा मृत्यूतालुक्यातील सातेफळ येथील सेवा सहकारी सोसायटीचे सचिव मनोज ज्ञानदेव दुधाट (३४) या युवकाचा बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव फाटा येथे अपघातात मृत्यू झाला. ते सातेफळ येथून यवतमाळ येथे मित्राकडे दुचाकीने गेले होते. रात्री परत येताना फाळेगाव फाटा येथे रस्ताच्या बाजूला उभ्या हार्वेस्टरला मागून रात्री १ वाजता दुचाकीची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ३ वाजता सातेफळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा आहे.