शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

परतवाड्यात ‘लॉकडाऊन’चा बळी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST

अनिल कडू। लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : शहरातील एका आॅटोरिक्षाचालकाचा १५ मे रोजी मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या काळात बुडालेला रोजगार, ...

ठळक मुद्देरोजगार, धान्याची विवंचना : पत्नीकडे, मित्रांजवळ केल्या होत्या भावना व्यक्त

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरातील एका आॅटोरिक्षाचालकाचा १५ मे रोजी मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या काळात बुडालेला रोजगार, आर्थिक विवंचना आणि कुटुंबाची चिंता या बाबींनी ब्रेन हॅमरेज होऊन त्यांचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, सामाजिक स्तरावर हा टाळेबंदीचा बळी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राजेश माहोरे (४७, रा. गोपालनगर) असे मृताचे नाव आहे.राजेश माहोरे हे निर्व्यसनी होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. हातमजूरीशीवाय दुसरा पर्याय नाही. मुलगा, मुलगी व पत्नी आणि धाकटा भाऊ एवढे छोटे कुटुंब. यात पत्नी दोन चार घरी जाऊन स्वयंपाक करते. मुलगा किराणा दुकानात मिळेल ते काम स्वीकारतो. लहान भाऊ खेडोपाडी जाऊन मोबाईलचे सिमकार्ड विकतो. पण, कोरोना लॉकडाऊनमुळे ते सर्व थांबले. गाठीशी असलेल्या पैशांतून राजेशने कुटुंबाचा गाडा हाकला. स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, आरसी नंबर नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदाराने धान्य दिले नाही. आता लॉकडाऊन उठले नाही, तर काही खरे नाही, मरणाशिवाय पर्याय नाही, अशी खंतही राजेश माहोरे यांनी आपल्या सवंगड्यांकडे मृत्यूपूर्वी अनेकदा व्यक्त केली.धान्यासाठी त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. याच मानसिक ताणतणावात आणि कुटुंबाच्या विवंचनेत ते खचले. १४ मे रोजी त्याची प्रकृती बिघडली. शेजारच्या मंडळींनी त्यांना परतवाडा येथील खाजगी रुग्णालयात आणि त्याच दिवशी सायंकाळी अमरावती येथे जिल्हा सामान्य रू ग्णालयात दाखल केले. तेथे बे्रन हॅमरेजचे निदान झाले. मात्र, १५ मे रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच दिवशी परतवाड्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. शेजारी, मित्रमंडळींनी वर्गणी गोळा केली. त्यांच्या घरी जीवनावश्यक वस्तूंसह किराणा पुरविला. मात्र, आता हे कुटुंब उघड्यावर आले आहे.लॉकडाऊनमुळे रोजगाराअभावी ते आर्थिक विवंचनेत होते. तणावाखाली होते. सतत कुटुंबाची काळजी करायचे. विचारात राहायचे. अचानक तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान ते गेले. लॉकडाऊन नसता, तर असे घडले नसते.- पिंगळा माहोरेमृताची पत्नीलॉकडाऊनमध्ये आॅटोरिक्षा बंद आहेत. यात राजेश माहोरेंचा रोजगार बुडाला. आर्थिक संकटाचा सामना करीत ते गतप्राण झाले.- विजू उखळकर, आॅटोचालक मित्र, ब्राम्हणसभा, परतवाडाआॅटोरिक्षा बंद. रोजगार गेला. रेशन दुकानदाराने आरसी नंबर नाही म्हणून शिव्या देत हाकलले. धान्य दिले नाही. धान्याकरिता तो माझ्याजवळ रडला. काही खरे नाही, आता मरायची वेळ आली आहे, असेही तो बोलला होता.- राजेश गवळी, मित्र, परतवाडाघटना दु:खद आहे. धान्य न देणाऱ्या दुकानदाराविरुद्ध निश्चित कारवाई करण्यात येईल. मृताच्या कुटुंबीयांना मदत केली जाईल.- मदन जाधव, तहसीलदार.मृत रुग्णाविषयी सध्या काही सांगता येणार नाही. बुधवारी उपजिल्हा रुग्णालयातील दस्तावेज बघून माहिती देता येईल.- डॉ. सरवत वर्मा, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या