शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीडित १८७ मुला-मुलींना शासनाचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:33 IST

पीडित महिला, मुली आणि बालकांना मदतीचा हात देऊन प्रतिष्ठा व आत्मविश्वासाने जगण्याचे बळ मनोधैर्य योजनेंतर्गत दिले जात आहे.

ठळक मुद्दे२.६५ कोटींचे अर्थसाहाय्य : समुपदेशनासह वैद्यकीय, कायदेशीर मदत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीडित महिला, मुली आणि बालकांना मदतीचा हात देऊन प्रतिष्ठा व आत्मविश्वासाने जगण्याचे बळ मनोधैर्य योजनेंतर्गत दिले जात आहे. विभागातील १८७ पीडितांना सुमारे २ कोटी ६५ लाख रूपयांच्यो आर्थिक मदतीसोबतच समुपदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदतही तत्परतेने उपलब्ध करून दिली जात आहे. याद्वारे त्यांचे पुनर्वसन करण्यात येत आहे.मनोधैर्य योजनेतून अमरावती जिल्ह्यात ६५ पीडितांना प्रत्येकी ५० हजार रूपये अर्थसहाय्य देण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील २० पीडितांना ४० लाख रूपये, वाशिम जिल्ह्यातील ३२ पीडितांना ३० लाख रूपये मदत देण्यात आली. अकोला जिल्ह्यात १० लाख २२ हजार ९०० रूपये, तर यवतमाळ जिल्ह्यात ९२ लाख रूपये अर्थसाहाय्य देण्यात आले आहेत.अत्याचार पीडित महिला-बालकांना आधार देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने २ आॅक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरू केली. या योजनेत बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान २ लाख आणि विशेष प्रकरणांमध्ये ३ लाखांची मदत देण्यात येते. अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी महिला आणि बालकांचा चेहरा विद्रुप झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास ३ लाख रूपये, जखमी झाल्यास ५० हजार रूपये अर्थसाहाय्य दिले जाते. महिला-बालकांवरील अत्याचार प्रकरणी गंभीर शिक्षा होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यातील पीडित महिला व बालकांना प्रतिष्ठा, आत्मविश्वास परत मिळवून देणेही गरजेचे आहे. पीडित महिला व बालकांना शारीरिक व मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, अर्थसाहाय्य देणे, समुपदेशन, निवास, वैद्यकीय व कायदेशीर मदत, उपचार सेवा उपलब्ध करणे आवश्यक असते. महिला, बालकांवर वाईट प्रसंग ओढवल्यास त्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समितीजिल्ह्याधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीमध्ये प्रस्ताव मंजूर होतात. या समितीमध्ये पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त निर्देशित करतील, असा पोलीस उपायुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सरकारी वकील व शासकीय अभियोक्ता, अध्यक्षाच्या मान्यतेने महिला व मुलांच्या सक्षमीकरणासाठी एक सदस्य तसेच जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी समितीचे सदस्य आहेत.असा आहे अर्थसाहाय्याचा विनियोगजिल्हा मंडळाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मंजूूर रक्कम संबंधितांच्या बँँक खात्यात जमा करतात. यापैकी ७५ टक्के रक्कम तीन वर्षांसाठी मुदती ठेवी म्हणून ठेवण्याय येते. उर्वरित २५ टक्के रक्कम पीडित किंवा त्यांच्या पालकांना खर्च करता येते. पीडित व्यक्ती जर अज्ञान असेल तर अशा प्रकरणात ७५ टक्के रक्कम मुदती ठेवी व त्याला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम मिळू शकते.या ठिकाणी करावा अर्जमहिला, बालकांवर अत्याचाराचे प्रकरण उद्भवल्यास त्याची पोलिसात तक्रार नोंदविली जाते. सदर प्रकरणात एफआयआर नोंद झाल्यानंतर मदतीचा प्रस्ताव संबंधित पोलीस ठाण्यामार्फत तयार केला जातो. तो प्रस्ताव त्या पोलीस ठाण्यामार्फतच जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यानंतरच हा प्रस्ताव जिल्हा क्षतिसाहाय्य आणि पुनर्वसन मंडळाकडे मंजुरीसाठी सादर केला जातो.पीडितांना जिल्हा शल्यचिकित्सकांद्वारे वैद्यकीय सेवामहिला, बालकांवरील अत्याचाराबाबत पोलिसात एफआयआर दाखल झाल्यानंतर मदतीसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्षतिसाहाय्य व पुनर्वसन मंडळाकडे अर्ज करावा लागतो. मंडळाकडे अर्ज सादर झाल्यानंतर तातडीने मदत देण्यात येते. पीडित महिला, बालकास जिल्हा शल्य चिकित्सकातर्फे वैद्यकीय सेवा पुरविली जाते.

अशी आहे समितीची कार्यपद्धती...: जिल्हा महिला व बालविकास अधिकाºयांना माहिती मिळताच संबंधित तपास पोलीस अधिकाºयांकडून या माहितीच्या आधारे निर्णय घेते. सबंधित पोलीस अधिकाºयांनी एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याची माहिती एसएमएसद्वारे किंवा ईमेलद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा महिला व बालकल्याण अधिकाºयांना कळविली जाते.