शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

विद्यापीठांच्या परीक्षांबाबत कुलगुरूंची ऑनलाईन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी परीक्षा, ‘कोरोना’ उपाययोजना, विद्यार्थ्यांचा सहभाग आदी विषयांवर ना. सामंत यांनी चर्चा केली. ते मंगळवार, ७ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

ठळक मुद्देउदय सामंत यांनी घेतली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग : राज्यपालांशी चर्चेनंतर आज होणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ आहे. परिणामी राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये बंद असून, उन्हाळी परीक्षा रखडल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी परीक्षा, ‘कोरोना’ उपाययोजना, विद्यार्थ्यांचा सहभाग आदी विषयांवर ना. सामंत यांनी चर्चा केली. ते मंगळवार, ७ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.२४ मार्च ते १४ एप्रिल या दरम्यान ‘लॉकडाऊन’ आहे. त्यामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी निगडित महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. मात्र, उन्हाळी २०२० परीक्षा अद्यापही झाल्या नाहीत. काही विद्यापीठांनी उन्हाळी परीक्षांचे कॅलेंडर तयार केले असताना ‘लॉकडाऊन’मुळे ते पुढे ढकलावे लागले. उन्हाळी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी किमान ४५ दिवसांचा कालावधीत आवश्यक आहे. दुसरीकडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सिलॅबस अपूर्ण असल्याची बाब ना. सामंत यांच्या पुढ्यात विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंनी मांडली. दरम्यान ‘कोरोना’शी मुकाबला करण्यासाठी विद्यापीठांची भूमिका आणि विद्यार्थ्यांचा सहभाग या विषयांवर ना. उदय सामंत यांनी कुलगुरूंकडून माहिती जाणून घेतली. कुलगुरूंसोबत झालेल्या आॅनलाईन बैठकीचा गोषवारा ना. सामंत हे मंगळवार, ७ एप्रिल रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार आहे. त्यानंतरच विद्यापीठाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल निर्णय घेतील, अशी माहिती आहे.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत ऑनलाईन बैठक घेतली. यात उन्हाळी परीक्षा, नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठांची भूमिका आदींबाबत माहिती जाणून घेतली. विशेषत: परीक्षांवर फोकस होता. राज्यपाल यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असे बैठकीतून स्पष्ट झाले.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठपरीक्षा होणारच४विद्यापीठ आणि महाविद्यालयात परीक्षेबाबत असलेला संभ्रम आता संपुष्टात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्थगित परीक्षा पुढे घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 'लॉकडाऊन'च्या पार्श्वभूमीवर परीक्षांच्या नियोजनासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. परीक्षा रद्द होणार नसून त्या विलंबाने घेण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. राज्यपाल यासंदर्भात मंगळवारी निर्णय घेणार आहे.