शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती आरटीओच्या ‘त्या’ कागदपत्रांची मुंबई पोलिसांकडून पडताळणी

By गणेश वासनिक | Updated: May 7, 2024 23:42 IST

पुन्हा दोषी अधिकारी-कर्मचारी रडारवर, अटकेतील तीन आरटीओ अधिकाऱ्यांचा कारागृहातच मुक्काम.

अमरावती : परराज्यातील चाेरीच्या ट्रकचे बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्री प्रकरण अमरावती आणि नागपूर येथील आरटीओच्या गळ्याचा फास बनत चालला आहे. नवी मुंबई पोलिसाच्या गुन्हे शाखेने अमरावती आरटीओतील आठ वाहनांच्या नोंदणी झालेल्या कागदपत्रांची पडताळणी चालविली आहे. याप्रकरणी चौकशीअंती आरटीओतील दोषी अधिकारी-कर्मचारी पोलिसांच्या रडारवर असून, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोमवारी अमरावती आरटीओकडून चाेरीच्या ट्रकचे बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी झालेल्या आठ प्रकरणांची कागदपत्रे सुपुर्द करण्यात आली आहेत. यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी कागदपत्रांच्या आधारे ३० एप्रिल रोजी मोटर वाहन निरीक्षक गणेश वरुठे, सहायक परिवहन अधिकारी भाग्यश्री पाटील आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके या तिघांंनाही आरोपी बनवून अटक केली आहे. आरटीओच्या या तीनही अधिकाऱ्यांना अद्यापही जामीन मिळाला नाही, ते मुंबई येथील कारागृहात बंदिस्त असल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी नवीन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेेने आठ वाहनांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे. या कागदपत्रांचे पोलिसांकडून सर्चिंग सुरू झाले असून, आरटीओत चाेरीच्या ट्रकचे बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी प्रकरणाचा प्रवास कसा सुरू होताे, याची शहानिशा केली जात आहे. यात आरटीओच्या कोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हात ओले केले, या दिशेने पोलिसांनी तपास आरंभला आहे. कायदेशीररीत्या हे प्रकरण न्यायालयात सिद्ध करता यावे, यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कागदपत्रांची जुळवाजुळव युद्धस्तरावर केली जात आहे. अमरावती आरटीओंकडून आठ वाहनांची कागदपत्रे मिळाली आहेत. आता या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. परराज्यातील चाेरीच्या ट्रकचे बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी हा प्रकार गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना तो जाणीवपूर्वक करण्यात आला का? या दिशेने तपास केला जात आहे. गुन्हेगारांना सोडणार नाही. याप्रकरणी रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे.- अमित काळे, एसीपी गुन्हे शाखा, नवी मुंबई विदर्भातील आरटीओत दलालराजअरुणाचल, उत्तर प्रदेश, नागालँड, दिल्ली व हरयाणा आदी ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेसिस नंबर बदलून बनावट कागदपत्रांद्वारे विदर्भातील आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने वाहनांची नोंदणी करून विक्री करणे हा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नागपूर, अमरावती आरटीओचे दलाल कनेक्शन बाहेर आणले. गत सहा महिन्यांपूर्वी बुलडाणा आरटीओतसुद्धा बनावट कागदपत्रांचे प्रकरण निदर्शनास आले होते. विदर्भात अमरावती, नागपूर, यवतमाळ, बुलडाणा, गोंदिया, अकोला आरटीओत मोठ्या प्रमाणात दलालराज असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती