लोकमत न्यूज नेटवर्कपुसला : वरूड-पांढुर्णा महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात फोफावली असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. या महामार्गाने नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले जात आहेत. बसस्थानकाजवळ महामार्गावरच वाहने उभे राहतात. त्यामुळे येथून वाट काढणे प्रवासी, नागरिक, दुचाकीस्वारांना कठीण झाले असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याकडे वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष आहे.वरूड-पांढुर्णा महामार्गाची नव्याने निर्मिती झाल्यापासून या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावतात. गेल्या अनेक महिन्यांपासून वरूड-पांढुर्णा महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. महामार्गावरच पुसला बस स्थानक आहे. प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गर्दी असते. या ठिकाणी वाहतुकीचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात आहे. स्पीड ब्रेकर लावले गेले नाहीत. अलीकडेच या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहने अनियंत्रित व सुसाट वे२गाने धावतात. मध्य प्रदेशातून येणारी प्रवासी वाहने तर नियम धाब्यावर बसवून सर्रास हाकली जातात.
वरूड-पांढुर्णा मार्गावर वाहने सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST
वरूड-पांढुर्णा महामार्गाची नव्याने निर्मिती झाल्यापासून या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावतात. गेल्या अनेक महिन्यांपासून वरूड-पांढुर्णा महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. महामार्गावरच पुसला बस स्थानक आहे. प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गर्दी असते. या ठिकाणी वाहतुकीचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात आहे.
वरूड-पांढुर्णा मार्गावर वाहने सुसाट
ठळक मुद्देअपघाताची शक्यता : बस स्थानकाजवळ अवैध थांबा