वाशिम: वाहन नोंदणी क्रमांक वाहनावर टाकताना त्याच्या नियमांची सर्रास पायमल्ली केल्या जात आहे. वाहनधारक विविध रंगात, डिझाईनव्दारे, क्रमांकाव्दारे नावे यासह नोंदणी क्रमांक आपल्या वाहनावर टाकून नियमांची पायमल्ली करीत आहेत. संबधित विभागाकडून यासंदर्भात एक विशेष मोहीम राबवून कारवाई करणे गरजेचे झाले आहे.नियमानुसार तात्पुरती नोंदणी झालेल्या वाहनचे नोंदणी क्रमांक तेवढेच नियमानुसार होतांना दिसून येते. नोंदणी क्रमांक प्रमाणित आकारापेक्षा मोठया अकारात लिहिण्यास हरकत नाही मात्र चमकणार्या रंगात रंगविणे बंधनीय असताना बर्याच वाहनांवर रेडियमव्दारे क्रमांक टाकण्यात येत आहे. तसेच ठरवून दिलेल्या आकारामध्ये नंबर टाकणे आवश्यक असताना तसे होतांना दिसून येत नाही. वाशिम जिल्हयामध्ये अशा वाहनांवर दंडही करण्यात आला आहे.वाहनांचे नोंदणी क्रमांक हे कायद्यात नमूद केल्याप्रमाणे एकसारखे लिहीले जात नाहीत असे क्रमांक विविध आकारच्या अक्षरांमध्ये लिहीले जातात व नंबर प्लेटवर इतर मजकुरही लिहीण्यात येतो. सदर क्रमांक सहज बदलता येण्याजोगे आकलन होत नाही व वाहन तपासणी अडथळे निर्माण होतात अपघात अथवा चोरी प्रकरणामध्ये ही वाहन नोंदणी क्रमांक योग्य न लिहीन्याने पुढील योग्य तपासणी किंवा कारवाई करता येत नाही. या त्रृटींच्या अनुषंगाने नोंदणी क्रमांकाच्या पाठयाबाबत एकसारखेपणा निर्माण होण्याच्या दृष्टीने व बनावटगीरी टाळण्याकरीता कायद्यात बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार वाहनांवर अतिसुरक्षित नंबर प्लेटबद्दल कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे. पण त्याची सुध्दा अंमलबजावणी अद्याप नाही. \
नंबर प्लेटवर कुठल्याही प्रकारचे स्टिकर्स अथवा इतर काहीही माहिती लिहीण्याची परवानगी नाही. मात्र याकडे कुणीही लक्ष न देता नियमांचे उल्लंघटन केल्या जात आहे. ट्रान्सपोर्ट वाहनाचे बाबतीत या दोन्ही प्लेट व्यतिरिक्त वाहनाचे दोन्ही बाजुस वाहन क्रमांक रंगवायचा आहे.दुचाकी , तीनचाकी वाहनांच्या वाहन नोंदणी क्रमांकाची साईज २00 बाय १00 मिलीमिटर असणे आवश्यक आहे. लाईट मोटर व्हिकलची ३४0/ २00 , मिडीयम कर्मशियल वाहनाच्या क्रमांकाची साईझ ५00 ते १२0 मिलीमिटर असतांना अनेकांकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे. याकरीता संबधित विभागाने वाहन नोंदणी क्रमांकाबाबतील नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईची मोहीम गतिमान करणे आवश्यक आहे. वाश्मि उपप्रादेशिक कार्यालयाच्यावतीने एका वर्षात शेकडो वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
** आरटीओ कार्यालयाकडून ४४७ वाहनांवर कारवाईउपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतिने २0१३ पासून ते आतापर्यंत ४४७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. केलेल्या कारवाईतून ८९00 रूपये दंड आकारण्यात आला आहे. वाहन नोंदणी क्रमांकाच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकास १00 रूपये दंड आकारण्यात येतो.